Advertisement

सगळ्यांनी मिळून खोटं बोलायचं हीच भाजपाची वृत्ती - संदीप देशपांडे


SHARES

मिळून खोटं बोलायचं ही भाजपाच्या सगळ्याच नेत्यांची वृत्ती झालीय. पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे सगळेच प्रवक्ते खोटं बोलून विकासकामं कशी होताहेत अन् भ्रष्टाचार कसा होत नाही, असं सांगून एक आभास निर्माण करत असल्याची घणाघाती टीका मनसे सरचिटणीस आणि प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी केली.

मनसेने काढलेल्या 'संताप मोर्चा'नंतर पुढं काय? या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी संदीप देशपांडे 'मुंबई लाइव्ह'च्या फेसबुक लाइव्हवर उपस्थित होते. यादरम्यान त्यांनी फेरीवाल्यांचा प्रश्न, मुंबईची झालेली बजबजपुरी, परप्रांतीय, बुलेट ट्रेन, भाजपाचं विकासाचं राजकारण, अशा सर्वच मुद्द्यांना स्पर्श करून मुंबईकरांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरं दिली.


हा मोर्चा राग व्यक्त करण्यासाठी  

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जो मोर्चा काढण्यात आला तो राजकारण करण्यासाठी नव्हता, तर तो राग व्यक्त करण्यासाठी होता. एल्फिन्स्टन दुर्घटनेत २३ जणांचा मृत्यू होतो, त्याला फक्त चेंगराचेंगरी हेच कारण असू शकतं का? बुलेट ट्रेन अहमदाबाद ते मुंबईच का? याचं उत्तर नमो रुग्ण देखील देऊ शकले नाहीत, असं म्हणत देशपांडे यांनी रेल्वे प्रशासन आणि भाजपा सरकारच्या भूमिकेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.



आता आमच्या भाषेत समजवण्याची वेळ

फेरीवाल्यांना १५ दिवसांत हटवा असं राज साहेबांनी रेल्वे प्रशासनाला अल्टिमेटम दिलंय. जर अधिकाऱ्यांनी हे अल्टिमेटम पाळलं नाही, तर त्यांना रुळावर कसं आणायचं हे आम्ही बघू... सरकारने आणि रेल्वे प्रशासनाने हे काम केलं नाही तर आम्ही आमच्या स्टाईलनं उत्तर देऊ, मग जे होईल त्याला सरकार जबाबदार असेल, असं खुलं आव्हानही देशपांडे यांनी सरकारला दिलं.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा