Advertisement

मनसेने केला पाकिस्तानी कपडे विक्रीचा विरोध


मनसेने केला पाकिस्तानी कपडे विक्रीचा विरोध
SHARES

कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आठवडाभरापासून संपूर्ण महाराष्ट्रात पाकिस्तान विरोधात आंदोलन करत आहे. गेल्या काही दिवसांपासून लोअर परळमधील पॅलेडियम मॉलमध्ये झारा ब्रँडच्या दूकानात पाकिस्तानी कपड्यांची विक्री सुरू असल्याची बाब मनसेच्या कार्यकर्त्यांना समजली तेव्हा मनसे कार्यकर्त्यांनी लोअर परळ येथील झारा शोरूमला धडक देऊन झारा ब्रँडच्या कपड्यांची नासधूस केली. याआधी मनसे विद्यार्थी सेनेचे अखिल चित्रे यांनी मालाडच्या इनॉर्बिट, कुर्लातल्या फिनिक्स आदी झाराचे शोरूम असलेल्या दूकानात लेखी पत्राद्वारे त्यांना पाकिस्तानी कपडे न विकण्याचा इशारा दिला होता.

पाकिस्तानमध्ये तयार झालेले कपडे झारा शोरूममध्ये विक्रीस उपलब्ध असल्याची माहिती मनसे कार्यकर्त्यांकडे होती. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आंदोलन करत पाकिस्तानी बनावटीचे कपडे रॅकमधून फेकून देत पायदळी तुडवून संताप व्यक्त केला. पाकिस्तानमध्ये तयार झालेल्या वस्तू विकू नका, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलनाला सामोरं जायला तयार राहा, अशी धमकीही मनसेच्या वतीने या वेळी देण्यात आली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा