दादागिरी करणाऱ्यांना मनसेचा चोप

Ghatkopar
दादागिरी करणाऱ्यांना मनसेचा चोप
दादागिरी करणाऱ्यांना मनसेचा चोप
दादागिरी करणाऱ्यांना मनसेचा चोप
दादागिरी करणाऱ्यांना मनसेचा चोप
See all
मुंबई  -  

शेतकऱ्यांवर दादागिरी करणाऱ्या परप्रांतीय भाजीविक्रेत्यांची मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगलीच धुलाई केली आहे. मुंबईच्या घाटकोपरमधला हा प्रकार समोर आला आहे. इथल्या अमृतनगरमध्ये राज्यातून आलेल्या शेतकऱ्यांना शेतमाल विकण्यास परप्रांतीय भाजीविक्रेत्यांनी विरोध केला होता. त्यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या परप्रांतीय भाजी विक्रेत्यांची धुलाई केली. शेतकऱ्यांचा माल थेट विकण्याची परवानगी सरकारने दिले असतानाही परप्रांतीय भाजी विक्रेते विरोध करतात, अशी तक्रार शेतकऱ्यांनी

केली. या प्रकरणी पोलिसांनी मनसे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी या सदर घटनेची माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.