मनसे स्वबळावर लढणार - राज ठाकरे

  मुंबई  -  

  दादर - मुंबई महानगर पालिका...गेली अनेक वर्ष या महानगरपालिकेवर शिवसेना-भाजपा सत्तेवर आहे. महत्त्वपूर्ण अशा समजल्या जाणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी आता सगळेच पक्ष सज्ज झालेत. मात्र विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या राज ठाकरे यांच्या मनसेने पालिका निवडणुकीसाठी वेगळीच व्यूहरचना आखली आहे. सोशल मीडियाचा वाढता प्रभाव लक्षात घेत मनसेने ' मनसे वॉर रूम' सुरू केली. या वॉररुमच्या माध्यमातून मुंबईकरांपर्यंत पोहोचण्याचा मनसेचा प्रयत्न असेल. याची सुरूवात म्हणून की काय राज ठाकरेंनी वॉर रूममधून स्वबळाचा नारा देत युतीच्या चर्चेला पुर्नविराम दिला.

  राज ठाकरेंसाठी मुंबई महानगरपालिका निवडणूक ही अस्तित्वाची लढाई असणार आहे. जर या निवडणुकीत मनसेला यश मिळालं नाही तर त्यांचं इंजिन थेट यार्डात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनसे 'वॉररुम' च्या माध्यमातून मुंबईकरांना हाक देणार आहे.

  'मनसेच्या या वॉर रुम'मधून राज ठाकरे आता मुंबईकरांना ट्रेलर दाखवतायेत की पिक्चर हे येत्या काळात स्पष्ट होईल. तुर्तास तरी मनसेने पालिका निवडणूकीची व्यूहरचना आखण्यात बाजी मारली हे नक्की.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.