Advertisement

पालिका निवडणुकीसाठी राज ठाकरेंचा 'एकला चलोचा नारा'

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आदेशानंतर मुंबई महापालिकांमध्ये सर्व जागांवर लढण्याची तयारी सुरू केल्याची माहिती मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी दिली आहे.

पालिका निवडणुकीसाठी राज ठाकरेंचा 'एकला चलोचा नारा'
SHARES

राज्यात सध्या महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरेंची मनसे (MNS) ही भाजप (BJP) आणि शिंदे गट (CM Eknath Shinde) एकत्र येणार अशी चर्चा सुरू होती. पण पालिका निवडणुकीत मनसेनं 'एकला चलो रे'चा नारा दिला आहे, अशी बातमी एबीपीनं दिली आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आदेशानंतर मुंबई महापालिकांमध्ये सर्व जागांवर लढण्याची तयारी सुरू केल्याची माहिती मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांत भाजप नेते आणि राज ठाकरेंच्या भेटीगाठी वाढल्या होत्या. तसंच गणपती दर्शनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे दोनदा एकमेकांना भेटले. त्यामुळे मनसेच्या इंजिनाला दोन नवीन डबे मिळणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र आता मनसेनं स्वबळाचा नारा देत भूमिका स्पष्ट केली आहे.

आगामी काळात महापालिकेच्या निवडणुका मनसे स्वबळावर लढवणार आहे. राज ठाकरेंच्या आदेशानुसार, मुंबईत 227 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे. तसेच, आम्ही स्वातंत्र्य आहोत सध्या आमचा कुणासोबतही न जाण्याचा निर्णय झाला आहे, असंही संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं आहे. 

गणेशोत्सवादरम्यान, झालेल्या मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंच्या भेटीला वेगळं महत्त्वा प्राप्त झालं होतं. त्यामुळे आता मुंबई महापालिकेत भाजप-शिंदे गट आणि मनसे एकत्र येणार असल्याचंही बोललं जात होतं. परंतु, आज मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे महापालिका निवडणुकांमध्ये मनसे स्वबळावरच निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे.  



हेही वाचा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं दसरा मेळाव्यावरून मोठं वक्तवं, मेळावा तर...

महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेल्यावरून राज ठाकरे संतप्त, म्हणाले...

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा