Advertisement

महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेल्यावरून राज ठाकरे संतप्त, म्हणाले...

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून आता महाराष्ट्राचं राजकारण तापताना दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेल्यावरून राज ठाकरे संतप्त, म्हणाले...
SHARES

फॉक्सकॉन प्रकल्पावरून आता महाराष्ट्राचं राजकारण तापताना दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ''फॉक्सकॉन प्रकरणाची सखोल चौकशी करा'', अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. राज यांनी ट्वीट करून ही मागणी केली आहे.

प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा हा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा?, असा सवालही त्यांनी आपल्या ट्विटमधून केला आहे.

राज ठाकरे म्हणाले आहेत की, ''फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक 1 लाख 58 हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा?'' असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

आपल्या आणखी एका ट्वीटमध्ये ते म्हणाले की, ''हा प्रकार गंभीर आहे. म्हणूनच या विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचं राज्य होतं. अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरु होणं, हे चांगलं लक्षण नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन या विषयाकडे बघायला हवं.''

दरम्यान आदित्य ठाकरे यांनी या विषयी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, ''वेदांता व फॉक्सकॉनने आपला प्रकल्प महाराष्ट्रात उभारा असण्याचे जाहीर केले होते. याबाबत आम्ही वेदांताचे अनिल अग्रवाल यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळीही त्यांनी महाराष्ट्रात येणार असल्याचे सांगितले होते. त्यांच्या टीमने तळेगावची निवड देखील केली होती. मात्र आता हा प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचे कळल्यानंतर मला धक्का बसला आहे.''

ते पुढे म्हणाले की, 95 टक्के सर्व व्यवस्थित पार पडले होते. 100 टक्के सायनिंगनंतर ठरणार होतं. सर्व ठरल्यानंतर ही कंपनी महाराष्ट्रातून बाहेर का गेली. हा एक महत्वाचा प्रश्न आहे.



हेही वाचा

महाराष्ट्रात येणारा सेमीकंडक्टरचा उद्योग गुजरातमध्ये गेला

'डबे जोडण्याच काम सुरू', राज ठाकरेंच्या विधानामुळे चर्चांना उधाण

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा