Advertisement

विधानसभा निवडणुकीत मनसेचं कमबॅक, ज्योतिष संमेलनातील भाकीत

विधानसभा निवडणुकीत मनसे पुन्हा एकदा फिनिक्सची झेप घेईल आणि दोन आकडी संख्या गाठेल, असं भाकीत नाशिक इथं झालेल्या ज्योतिष संमेलनात व्यक्त करण्यात आलं आहे.

विधानसभा निवडणुकीत मनसेचं कमबॅक, ज्योतिष संमेलनातील भाकीत
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणांनी राज्यात लोकसभा निवडणूक गाजवली. परंतु या निवडणुकीत मनसेचा एकही उमेदवार उभा नसल्याने मनसेला त्याचा प्रत्यक्ष लाभ घेता आला नाही. असं असलं, तरी विधानसभा निवडणुकीत मनसे पुन्हा एकदा फिनिक्सची झेप घेईल आणि दोन आकडी संख्या गाठेल,  असं भाकीत नाशिक इथं झालेल्या ज्योतिष संमेलनात व्यक्त करण्यात आलं आहे.

महाआघाडीचा फायदा 

सध्या नाशिक इथं ज्योतिष संमेलन सुरू आहे. या संमेलनात महाराष्ट्र ज्योषित परिषदेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मारटकर शास्त्री यांनी मनसेच्या जागांबाबत अंदाज वर्तवला आहे. त्यांच्या मते मनसे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करू विधानसभा निवडणूक लढवेल. या निवडणुकीत मतदारांचा मनसेच्या उमदेवारांना चांगला पाठिंबा मिळेल. त्या जाेरावर मनसे आमदारांचा दुहेरी आकडा गाठेल.  

 ग्रहांची स्थिती अनुकूल

सन २०१४-२०१९ या काळात राज यांच्या पत्रिकेतील ग्रहांची स्थिती अनुकूल नव्हती. त्यामुळे त्यांना या काळात राजकीयदृष्ट्या बॅकफूटला राहावं लागलं. परंतु आता राज यांच्या पत्रिकेतील गुरू पुन्हा धनू राशीत येत आहे. त्याचा फायदा राज यांना येत्या विधानसभा निवडणुकीत मिळेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाआघाडीत सामील झाल्यास मनसेला फायदा होईल, असं मत मारटकर यांनी व्यक्त केलं आहे.

 पंतप्रधानपदी मोदीच

एवढंच नाही, तर राज्यात भाजपा-शिवसेना युतीच्या जागा घटतील. केंद्रात भाजपाला कमी जागा मिळणार असल्या, तरी नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान होतील, असंही भाकीत त्यांनी केलं आहे. 



हेही वाचा-

Exit Polls Results 2019: राज्यात युतीचाच झेंडा फडकणार, ४८ पैकी ३६-३८ जागा मिळण्याचा अंदाज

Exit Poll Results: तिसऱ्या आघाडीच्या हालचालींना वेग



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा