Advertisement

'पीएम नरेंद्र मोदी' सिनेमाचा ट्रेलर YouTube वरून हटवला

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात आचारसंहिता सलागू करण्यात आली आहे. त्यामुळं आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी 'पीएम नरेंद्र मोदी' यांचा बायोपिक प्रदर्शित करण्याला निवडणूक आयोगानं स्थगिती दिली. त्याशिवाय, चित्रपटाला स्थगिती दिल्यानंतर आता चित्रपटाचा ट्रेलरही युट्यूबवरून हटवण्यात आला आहे.

'पीएम नरेंद्र मोदी' सिनेमाचा ट्रेलर YouTube वरून हटवला
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित 'पीएम नरेंद्र मोदी' हा सिनेमा ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात आचारसंहिता सलागू करण्यात आल्याने आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी 'पीएम नरेंद्र मोदी' यांचा बायोपिक प्रदर्शित करण्याला निवडणूक आयोगानं स्थगिती दिली. त्याशिवाय, सिनेमाला स्थगिती दिल्यानंतर आता सिनेमाचा ट्रेलरही युट्यूबवरून हटवण्यात आला आहे. 


व्हिडिओ हटवला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'पीएम नरेंद्र मोदी' ऑफिशियल ट्रेलर असं युट्यूबवर सर्च केल्यावर व्हिडिओ उपलब्ध नसल्याचं दिसतं. त्यामुळं, निवडणूक आयोगानं प्रदर्शनावर दिलेल्या स्थगितीच्या निर्णयामुळं हा ट्रेलर सोशल मीडियावरून काढून टाकण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


प्रदर्शनावर स्थगिती

'पीएम नरेंद्र मोदी'  हा चित्रपट २९ मार्च रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, सेन्सॉर बोर्डाचं प्रमाणपत्र न मिळाल्यानं सिनेमा ५ एप्रिल रोजी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानं हा सिनेमा ११ एप्रिल रोजी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, निवडणुकीच्या काळात सिनेमा प्रदर्शित झाल्यास आचारसंहितेचा भंग होईल, त्यामुळे निवडणूक आयोगानं 'पीएम नरेंद्र मोदी' या सिनेमाचं प्रदर्शन रोखण्याचा निर्णय घेतला.



हेही वाचा -

मेहुल चोक्सीला दणका, बॅंका करणार कंपनीचा लिलाव

क्रॉफर्ड मार्केटच्या ‘फेज-२’च्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा