Advertisement

गांधीजी गेले, मोदीजी आले


गांधीजी गेले, मोदीजी आले
SHARES

मुंबई – स्वातंत्र्यसमरात चले जावचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधींना खादी ग्रामोद्योग मंडळानेच आता चले जाव केलेय. 2017च्या डायरीवर महात्मा गांधींच्या फोटोऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो झळकलाय. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनाप्रणित कामगार संघटनेच्या सभासद कर्मचाऱ्यांनी विले पार्ले येथील खादी ग्रामोद्योग आयोगाच्या कार्यालयासमोर तोंडावर काळी पट्टी बांधून निदर्शने केली.
राष्ट्रपिता महात्मा गांधींनी चरखा आणि टकळीचा वापर करून सूतकताई करतानाच इंग्रजांविरुद्धचा स्वातंत्र्यलढा लढला. साहजिकच स्वतंत्र भारतात खादीचा प्रसार आणि महात्मा गांधी या जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या. पण हे चित्र आता बदललंय. नेहमी खादी ग्रामोद्योगच्या डायरीवर महात्मा गांधींचा फोटो असायचा. पण या वर्षाच्या डायरीवर झळकतोय तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो. चरखा चालवणाऱ्या महात्मा गांधींऐवजी या डायरीवर झळकत आहेत ते चरखा चालवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्यामुळे हा महात्मा गांधी आणि त्यांच्या विचारांना हद्दपार करण्याचा डाव असल्याच्या भूमिकेतून ही निदर्शने झाली. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेच्या खासदारांच्या नेतृत्वाखालील कामगार संघटनेकडून ही निदर्शने झाली, हे विशेष उल्लेखनीय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा