मुंबईकरांच्या नजरेतून उत्तर प्रदेशची निवडणूक

मुंबई - उत्तर प्रदेशमध्ये जोरदार मुसंडी मारत भाजपाने एकहाती सत्ता मिळवली आहे. मुंबईतही लाखो उत्तर भारतीय राहतात. भाजपाच्या या विजयासंदर्भात त्यांच्याही प्रतिक्रिया मुंबई लाइव्हने जाणून घेतल्या आहेत. भाजपा खूप चांगले काम करत आहे. त्यामुळे त्यांना उत्तर प्रदेशच्या जनतेने नवी संधी दिली आहे, अशी प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केली. तर मोदी सरकारने उत्तर प्रदेशात रोजगार उपलब्ध केले पाहिजेत, अशा अपेक्षाही मुंबईतल्या काही उत्तर प्रदेशातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Loading Comments