Advertisement

मोहन प्रकाश यांच्या निशाण्यावर भाजपा


मोहन प्रकाश यांच्या निशाण्यावर भाजपा
SHARES

नरिमन पॉइंट - मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाचं चलन, रिझर्व बँकेवरचा विश्वास आणि अर्थव्यवस्थेच्या प्रतिष्ठेला धक्का लागला आहे. अशी टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी भाजपावर केली आहे. गुरुवारी नरिमन पॉइंटच्या गांधीभवन इथल्या काँग्रेस कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
केंद्रातल्या सरकारचा स्वतःवरच विश्वास नाही त्यामुळे नोटबंदीनंतर आतापर्यंत 60 वेळा निर्णय बदलले आहेत. नोटाबंदीच्या या निर्णयामुळे कॅशलेस व्यवहाराची सुविधा देणाऱ्या परदेशी कंपन्यांना किती फायदा झाला? याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मोहन प्रकाश यांनी उत्तरही मागितलं. नोटाबंदीच्या निर्णयामुळे अनेक शहरातील पंरपरागत उद्योग बंद झाले आहेत. अनेक कामगारांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. हजारो कुटुंबांवर उपाशीपोटी राहण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून शेतमाल, भाजीपाला आणि फळांना भाव नसल्यानं शेतकरी भाजीपाला रस्त्यावर टाकत आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठ्या मंदीचा सामना करावा लागू शकतो असा इशारा मोहन प्रकाश यांनी दिला.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा