60 हून अधिक माजी नगरसेवक निवडणूक रिंगणात

 Mumbai
60 हून अधिक माजी नगरसेवक निवडणूक रिंगणात

मुंबई - महापालिकेच्या निवडणूक रिंगणात या वेळी तब्बल 60 हून अधिक माजी नगरसेवक उतरले आहेत. मागील निवडणुकीत आरक्षणामुळे तर काहींचे पत्ते पक्षाकडून कापले गेल्यामुळे त्यांची नगरसेवक बनण्याची संधी हुकली होती. परंतु आता नव्या प्रभाग आरक्षणामुळे तसेच युती आणि आघाडी तुटल्यामुळे अनेक माजी नगरसेवकांना निवडणूक लढण्याचा मार्ग खुला झाला आहे.

महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे आदी पक्षांकडून सुमारे 60 माजी नगरसेवकांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामध्ये शिवसेना पक्षातून 26 माजी नगरसेवक निवडणूक रिंगणात असून त्याखालोखाल काँग्रेस 20, भाजपा 5, मनसे 3, राष्ट्रवादी काँग्रेस 2 आणि समाजवादी पक्ष 1 आदी माजी नगरसेवक पुन्हा आपले नशीब आजमावून महापालिकेत एंट्री मारण्यास तयार आहेत.

माजी नगरसेवकांची पक्ष निहाय संख्या

शिवसेना:

अशोक सावंत, शुभदा गुडेकर, भालचंद्र म्हात्रे, राजुल पटेल, मनोहर पांचाळ, सुभाष सावंत,  चंद्रकांत पवार, कामिनी शेवाळे, कमलाकर नाईक, चित्रा सांगळे, संजय अगलदरे, मंगेश सातमकर, विश्वनाथ महाडेश्वर, मिलिंद वैद्य, विशाखा राऊत, आशिष चेंबूरकर, परशुराम देसाई, मिनल जुवाटकर, अरविंद बने, सुवर्णा मद्याळकर, रिना सुर्वे, यशवंत जाधव, सुवर्णा करंजे, मिनाक्षी पाटील, शामली तळेकर

काँग्रेस:

अंजली दराडे, निर्मला सिंह, वेलू स्वामी नायडू, विठ्ठल लोकरे, गौतम साबळे, जयंती सिरोया

नितीन सलागरे, जगदीश अमीन कुट्टी, धर्मेश व्यास, सूर्यवंश ठाकूर, कविता रॉड्रिग्स, आशा कोपरकर, काशिनाथ कराडकर, उपेंद्र दोशी, रवीराजा, जनक संघवी, पुरण दोषी, पारुल मेहता, दिक्षिता शाह

महाराष्ट्र नवनिर्माण सेना:

परमेश्वर कदम, राजा चौगुले, रेणुका दिवे

भारतीय जनता पार्टी:

प्रभाकर शिंदे, मंगेश सांगळे, भालचंद्र शिरसाट, रुक्मिणी खरटमोल

राष्ट्रवादी काँग्रेस:

वनिता इन्सुलकर, भारती पिसाळ

समाजवादी पक्ष : आस्मा शेख

Loading Comments