Advertisement

संभाजीराजे, उदयनराजेंनी भाजपकडून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा- शरद पवार

खासदार संभाजीराजे छत्रपती आणि छत्रपती उदयनराजे या दोन्ही छत्रपतींनी केंद्रातील भाजप सरकारच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.

संभाजीराजे, उदयनराजेंनी भाजपकडून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा- शरद पवार
SHARES

भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभेत गेलेले खासदार संभाजीराजे छत्रपती आणि छत्रपती उदयनराजे या दोन्ही छत्रपतींनी केंद्रातील भाजप सरकारच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. (mp chhatrapati sambhaji raje and udayanraje must take a help of bjp to solve maratha reservation problem says sharad pawar)

संभाजीराजे छत्रपती मराठा आरक्षणाचा प्रश्न संसदेत जोरकसपणे मांडत आहे. त्यासाठी आवश्यक लोकांच्या भेटीगाठी देखील ते घेत आहेत. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा अंतिम निकाल लागत नाही, तोपर्यंत सर्व सरकारी भरती स्थगित करण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. तर दुसऱ्या बाजूला मराठा समाजाला आरक्षण मिळत नसेल तर सर्वांचंच आरक्षण रद्द करा. मराठा आरक्षणासाठी वेळ पडल्यास खासदारकी सोडण्यास देखील तयार आहे, अशी भूमिका उदयनराजे यांनी मांडली आहे. दोन्ही छत्रपतींनी मराठा आरक्षणप्रकरणी ठोस भूमिका घेतल्याने शरद पवारांनी त्यांना हा सल्ला दिला आहे.

हेही वाचा - सरकारने नीट बाजू न मांडल्यामुळेच मराठा आरक्षणाला स्थगिती- रावसाहेब दानवे

खासदार संभाजीराजे छत्रपती आणि छत्रपती उदयनराजे हे दोन्ही छत्रपती भाजपाच्या कोट्यातील जागेवरून राज्यसभेत गेले आहेत. तेव्हा या दोघांनीही केंद्र सरकारच्या मदतीने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा. त्यासाठी आंदोलन करण्याची आवश्यकता भासल्यास दोघांनीही त्या आंदोलनाचं नेतृत्व देखील करावं, असं शरद पवार यांनी सांगितलं आहे.

तत्पूर्वी, आरक्षणास स्थगिती मिळाल्याचे खापर राज्यातील विरोधी पक्षांचे लोक सध्याच्या सरकारवर फोडत असतील तर ते सकल मराठा समाजाशी द्रोह करीत आहेत. ही वेळ एकमेकांवर दोषारोप करण्याची नाही, तर एकमेकांच्या मांडीस मांडी लावून, खांद्यास खांदा भिडवून मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणाचा गुंता सोडवण्याची आहे. भाजप नेत्यांनी हा प्रश्न घेऊन पंतप्रधान मोदींचे मन वळवायला हवे. सध्या मोदी यांनी मनात आणले तर अशक्य ते शक्य होण्याचा कालखंड आहे, पण ‘मराठा आरक्षणाची कोंडी फोडण्यासाठी वेळ द्या’ असे पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवूनही वेळ मिळत नसेल तर राज्यातील भाजप पुढाऱ्यांना महाविकास आघाडीस दोष देण्याचा अधिकार नाही, असं शिवसेनेनं सुनावलं आहे.

हेही वाचा - मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी ठाकरे सरकारचे ८ मोठे निर्णयRead this story in English
संबंधित विषय
Advertisement