Advertisement

'काँग्रेसनं सुरू केलेल्या नौटंकीचा शेवट आम्ही मुंबईत करु'- मनोज कोटक

पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपा खासदार मनोज कोटक यांच्या घराबाहेर मुंबई काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे.

'काँग्रेसनं सुरू केलेल्या नौटंकीचा शेवट आम्ही मुंबईत करु'- मनोज कोटक
SHARES

मुंबईत भाजप व कॉंग्रेस यांच्यातील वाद पुन्हा सुरू झाला आहे. पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपा खासदार मनोज कोटक यांच्या घराबाहेर मुंबई काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. मात्र त्याला जशास तसं उत्तर देण्याचा इशारा भाजपाने दिला आहे.

खासदार मनोज कोटक यांनी काँग्रेसचे कार्यकर्ते इथे आले नाहीत तर आमचे कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यालयात जातील असा इशारा दिला आहे. “काँग्रेसने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर येणारी भाषा केल्यानंतर त्यादिवशी सुद्धा सांगितले होते की भाजपा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. काँग्रेसला भाड्याने माणसे आणावी लागत आहेत.

आज देखील आमच्या आमदारांनी ठरवले आहे की, १२ वाजेपर्यंत काँग्रेसचे कार्यकर्ते इथे आले नाहीत तर आमचे कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यालयात जातील. ही नौटंकी त्यांनी सुरु केलीय त्याचा शेवट आम्ही मुंबईत करु,” असा इशारा खासदार मनोट कोटक यांनी दिला आहे.

“काँग्रेसच्या नेत्यांची कार्यालये आणि घरे आहेत. संसदेत पंतप्रधान मोदींनी बोलल्यानंतर त्यावर बोलण्यासाठी संसद आहे. राहुल गांधी हे संसदेत नसतात. उत्तर ऐकायला उपस्थित नसतात. संसदेत काँग्रेसच्या खासदारांना आवाज नाही आणि लोकांना वेठीस धरले जात आहे. याला भाजपा निश्चित उत्तर देईल,” अशी प्रतिक्रिया खासदार मनोज कोटक यांनी एबीपी माझासोबत बोलताना दिली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा