Advertisement

राष्ट्रवादीची विधानसभेची तयारी, जाहीरनामा समितीची घोषणा


राष्ट्रवादीची विधानसभेची तयारी, जाहीरनामा समितीची घोषणा
SHARES

विधानसभा निवडणूक ३ महिन्यांवर येऊन ठेपल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनामा समितीचे स्थापना केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी खासदार अॅड. वंदना चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यात ३५ सदस्यांचा समावेश आहे.  

आगामी विधानसभा निवडणुकीत जनतेच्या आशा-आकांक्षांना लक्षात घेऊन ही समिती जाहीरनाम्यात संबंधित विषयांचा समावेश करेल. या समितीची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली.

या समितीच्या अध्यक्षपदी खासदार वंदना चव्हाण आहेत. तर, समितीतील इतर सदस्यांमध्ये माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, आ. शशिकांत शिंदे, राष्ट्रीय महिला अध्यक्ष फौजिया खान, आ. जितेंद्र आव्हाड, आ. राजेश टोपे, माजी मंत्री अनिल देशमुख, आ. राणा जगजितसिंह पाटील, माजी खा. संजीव नाईक, माजी खा. समीर भुजबळ, माजी खा. आनंद परांजपे, उषा दराडे, आ. विदया चव्हाण, आ. विक्रम काळे, आ. बाबाजानी दुर्राणी, आ. ख्वाजा बेग, जीवनराव गोरे, आ. प्रकाश गजभिये, माजी आ. अमरसिंह पंडित, माजी आ.जयदेव गायकवाड, सारंग पाटील, सुरेश पाटील, शेखर निकम, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, मुंबई युवती अध्यक्ष अदिती नलावडे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विजय कन्हेकर आदींचा समावेश आहे. 

याशिवाय विशेष निमंत्रित म्हणून पक्षाचे कोषाध्यक्ष आ. हेमंत टकले, सुधीर भोंगळे, डॉ. मिलिंद आवाड तसंच समन्वयक म्हणून प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


हेही वाचा-

राज्याचा आर्थिक पाहणी अहवालही फुगवला? विरोधकांनी केली आकडेवारी तपासण्याची मागणी

'आयाराम गयाराम, जय श्रीराम', विरोधकांनी केलं मुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्र्यांना लक्ष्य



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा