Advertisement

मेट्रोमुळे राजकीय पक्षांची कार्यालयं स्थलांतरित होणार


मेट्रोमुळे राजकीय पक्षांची कार्यालयं स्थलांतरित होणार
SHARES

मुंबई - मेट्रो तीनच्या प्रकल्पासाठी राज्यातील प्रमुख पक्षांची कार्यालय स्थलांतरित करावी लागणार आहेत. मेट्रो तीनचा प्रकल्प कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मार्गासाठी बनवला जाणार आहे. या प्रकल्पामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शेकाप यांच्या पक्ष कार्यालयांची जागा जाणार आहे. तर महापालिका मार्गावरील रिपाइं (आठवले गट), रिपाइं (गवई गट) आणि प्रेस क्लबच्या मागील उद्यानाची जागा या योजनेसाठी वापरण्यात येईल. एमएमआरसीनं या कार्यालयांना अंतिम नोटिस बजावली आहे. मात्र एमएमआरसीनं या कार्यालयांसाठी बॅलार्ड इस्टेट आणि कुलाबा इथं जागा देऊ केली आहे. मात्र काही पक्षांना या जागेबद्दल आक्षेप आहे. याबाबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सांवत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘मुंबई लाइव्ह’ला माहिती दिली की, मेट्रोच्या योजनेला कुणाचाही विरोध नाही. मात्र जागा देण्यात येणार आहे, ती ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिक आणि कार्यकर्त्यांसाठी गैरसोयीची आहे. त्यामुळे पर्यायी जागा निश्चितीसाठी एमएमआरसीशी सध्या चर्चा सुरू आहे.
तसंच आरपीआय(गवई गट)चे अध्यक्ष डॉ. राजेंद्र गवई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नोटीस मिळाल्याचा दुजोरा दिला तसेच कार्याकर्त्यांच्या सोयीची जागा मिळावी अशी मागणी केली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा