भाजपाचा एलईडी प्रचार

 Mumbai
भाजपाचा एलईडी प्रचार

मुंबई - भाजपाने आता आपल्या प्रचारासाठी खास एलईडी प्रचार व्हॅन तयार केल्या आहेत. मुंबई भाजपातर्फे या 25 एलईडी प्रचार व्हॅन मुंबईभर भाजपाचा प्रचार आणि प्रसार शनिवारपासून करणार आहे. तसेच मुंबईतील भाजपा आमदार, जिल्हाध्यक्षांकडून अशाच प्रकारे एलईडी प्रचार व्हॅन म्हणजे मल्टीमीडिया व्हॅन बनविण्यात आलेल्या आहेत. या व्हॅन्सवर एलईडी स्क्रीन लावण्यात आली आहे. या व्हॅन्स मुंबईच्या कानाकोपऱ्यात जाऊन राज्यात भाजपा सरकार आल्यानंतर कशा प्रकारे विकास झाला आहे, भाजापाचे मुंबईसाठी काय व्हिजन आहे, भाजपाचा जाहीरनामा याबद्दल प्रचार करणार आहेत. मुंबईत एकूण 100 च्या आसपास व्हॅन प्रचारासाठी वापरण्यात येणार आहेत.

Loading Comments