आशिष शेलारांनी घेतली शरद पवारांची भेट

  Pedder Road
  आशिष शेलारांनी घेतली शरद पवारांची भेट
  मुंबई  -  

  पेडर रोड - भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यामुळे राजकीय क्षेत्रात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. पवार यांच्या पेडर रोडच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन शेलार यांनी भेट घेतली. मुंबई क्रिकेट संघटनेच्या संदर्भात यावेळी चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

  सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोव्यामध्ये कमी जागा मिळाल्या असताना भाजपा इतर पक्षांच्या मदतीने सरकार बनवत आहे. या वेळी त्याबाबतही आशिष शेलार यांनी चर्चा केली. राष्ट्रवादी पक्षाने एक जागा गोव्यात जिंकली आहे. रविवारी यशवंतराव चव्हाण यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त झालेल्या एका कार्यक्रमात शरद पवारांनी कॅशलेस योजनेचे कौतुक केले होते. या योजनेमुळे पारदर्शकता वाढली, असं वक्तव्यही त्यांनी केलं होतं.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.