अमित शाहांचे स्वागत अन् भाजपाचे शक्तिप्रदर्शन

  Mumbai
  अमित शाहांचे स्वागत अन् भाजपाचे शक्तिप्रदर्शन
  मुंबई  -  

  मुंबई, ठाणे आदी महापालिका तसेच नगरपालिकांच्या निवडणूक निकालानंतर भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे शुक्रवारी मुंबईत पहिल्यांदाच आगमन होत आहे. महापलिकेच्या निवडणुकीत भाजपाची ताकद वाढलेली असून या नगरसेवकांच्या मदतीने मुंबईत विमानतळापासून ज्या ज्या ठिकाणी अमित शाह थांबणार आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी भाजपा शक्तिप्रदर्शन करणार आहे. यासाठी प्रत्येक नगरसेवकाला 50 कार्यकर्ते घेऊन अमित शहा यांच्या स्वागतासाठी सज्ज राहण्याचे आदेशच भाजपाच्या नेत्यांनी दिले आहेत.

  भाजपा सरकारला तीन वर्षे पूण झाल्यामुळे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे शुक्रवारी 16 जून रोजी मुंबईत आगमन होत आहे. शाह यांचे मुंबईत तीन दिवस वास्तव्य राहणार असून या तिन्ही दिवशी मुंबईसह राज्यातील पदाधिकारी, विविध क्षेत्रातील लोकांची भेट घेऊन सरकारच्या कारभाराचा ते आढावा घेणार असल्याचे समजते.

  मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाचे 82 नगरसेवक निवडून आले आहे. मुंबईतील भाजपाची ताकद वाढल्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करत एकप्रकारे भाजपा शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे म्हटले जात आहे. यासाठी प्रत्येक नगरसेवकाला एक बस भरून कार्यकर्ते नेमून दिलेल्या ठिकाणी उभे करण्याच्या सूचना केल्या आहेत. विमानतळावर उतरल्यानंतर अमित शाह सर्वप्रथम शिवाजी पार्क येथील शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला तसेच चैत्यभूमीला भेट देतील. पुढे सह्याद्री विश्रामगृहात जातील. त्यामुळे विमानतळ परिसर, शिवाजी पार्क आणि सह्याद्री विश्रामगृह आदी ठिकाणी हे नगरसेवक कायकर्ते घेऊन स्वागतासाठी उभे राहणार असल्याचे भाजपाच्या सूत्रांनी सांगितले.

  प्रभागांतील जाणकार, तज्ज्ञांशी साधणार संवाद -
  सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्यामुळे मुंबईत निवडून आलेल्या 82 नगरसेवकांसह इतर प्रभागांमधील जाणकार, तज्ज्ञ यांच्यासोबत चर्चा करून ते सरकारच्या भविष्यातील योजनांची माहिती त्यांना देणार आहेत तसेच या सरकारच्या विविध विभागांतील लोकप्रतिनिधींच्या कामांबाबतची अपेक्षाही जाणून घेणार आहेत. यासाठी भाजपाने आपल्या 82 नगरसेवकांना आपल्या प्रभागातील डॉक्टर, वकील, अभियंता, तसेच विविध क्षेत्रातील तज्ज्ञ अशाप्रकारे एएलएम व एनजीओच्या लोकांशी संवाद साधण्यास सांगितले आहे. येत्या रविवारी 18 जून रोजी कूपर रुग्णालयासमोरील जे. बी. हॉलमध्ये शाह सुमारे 10 हजारहून अधिक प्रतिष्ठीत नागरिकांशी संवाद साधणार आहेत. यामध्ये विशेषत: नगरसेवक, आमदार आणि खासदार आदी लोकप्रतिनिधींच्या कामगिरीचा आढावाही या लोकांकडून ते जाणून घेणार असल्याचे समजते. यासाठी एनजीओ तसेच एएलएमसह विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विचारवंतांना कार्यशाळेसाठी भाजपाने आवताण पाठवले आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.