Advertisement

राज्यपालांना निवेदन देण्यासाठी शेतकऱ्यांना करावी लागणार प्रतीक्षा

कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करणारं निवेदन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देण्याचा शेतकऱ्यांच्या मानस आहे.

राज्यपालांना निवेदन देण्यासाठी शेतकऱ्यांना करावी लागणार प्रतीक्षा
SHARES

मागील २ महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी सोमवारी मुंबईत शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा निघाला. किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा रविवारी दक्षिण मुंबईतील आझाद मैदान इथं दाखल झाला. सोमवारी जाहीर सभेनं शेतकऱ्यांचा मोर्चा राजभवनावर धडकणार आहे.

कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करणारं निवेदन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देण्याचा शेतकऱ्यांच्या मानस आहे. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचा मोर्चा थोड्याच वेळात राजभवनावर धडकणार आहे. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सध्या राजभवनात नसून, ते गोव्यात असल्याची माहिती समोर येत आहे.

कोश्यारी यांच्याकडं गोव्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त पदभार आहे. त्यामुळं राज्यपालांकडून शेतकरी मोर्चाच्या शिष्टमंडळाला संध्याकाळी ५ वाजताची वेळ दिली असल्याचं समजतं. त्यामुळं राज्यभरातून मुंबईत आलेले शेतकरी मंगळवारी मुक्काम करण्याची शक्यता आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा