Advertisement

राज ठाकरेंविरोधातील गुन्हा रद्द


राज ठाकरेंविरोधातील गुन्हा रद्द
SHARES

आझाद मैदान दंगली विरोधात मनसेतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चाप्रकरणी राज ठाकरे आणि इतर मनसे पदाधिकाऱ्यांविरोधातील गुन्हे मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी रद्द केले. न्या. रणजीत मोरे आणि न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने 2011 साली दाखल केलेला स्पेशल एलएसी रद्द केला आहे.

2011 साली मुंबईच्या आझाद मैदान परिसरात मोठी दंगल झाली होती. या दंगलीत मोठ्या प्रमाणात जाळपोळ, तसेच अनेकांना मारहाण झाली होती. त्यानंतर या विरोधात आणि रझा अकादमीविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोर्चा काढला होता.


गुन्हा दाखल झाल्यानंतर 2014 साली आझाद मैदान पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते. गुन्हा दाखल झाल्याच्या 90 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करणे बंधनकारक असते. पण पोलिसांनी तसे केले नाही, म्हणून आम्ही उच्च न्यायालयात दाद मागितली. उच्च न्यायालयाने आमचे म्हणणे ग्राह्य धरत हा खटला रद्द केला.

राजेन्द्र शिरोडकर, मनसेची बाजू मांडणारे वकील


राज ठाकरे यांच्या मोर्चानंतर मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त अरुप पटनाईक यांची तडकाफडकी बदलीही करण्यात आली होती. मात्र, मोर्चा काढल्या विरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि इतर मनसे पदाधिकाऱ्यांविरोधात स्पेशल एलएसी दाखल करण्यात आला होता.




हेही वाचा

ज्याचं सरकार त्याचा रबर स्टॅम्प म्हणजे, 'राष्ट्रपती' - राज ठाकरे


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा