Advertisement

उत्सवाचं बाजारीकरण थांबवा - राज ठाकरे


उत्सवाचं बाजारीकरण थांबवा - राज ठाकरे
SHARES

‘उत्सवांचे सुरु असलेले बाजारीकरण थांबवा, मग आयोजनांवर कुणीच हरकत घेणार नाही.’ असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्सव साजरे करणाऱ्या मंडळांना दिला आहे.

दहीहंडी उत्सव समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी राज यांनी समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांना ही सूचना केली.

उत्सवांमध्ये डीजे, लाऊडस्पीकर, सेलिब्रेटीज नको, पारंपारिक ढोल ताशाच्या गजरात दहीहंडी साजरी करा, अशी भूमिका ठाकरे यांनी दहीहंडी उत्सव समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांपुढे यावेळी मांडली.


आधी शिवसेनेचे आव्हान

दहीहंडी, गणेशोत्सव जवळ येऊ लागताच न्यायालयाने घातलेल्या निर्बंधावरून राजकारणही तापायला लागले आहे. आधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारने या निर्बंधावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अन्यथा शिवसेना मंडळांच्या पाठिशी उभी राहून दहीहंडी, गणेशोत्सव दणक्यात साजरा करेल, असे म्हणत भाजपाला आव्हान दिले.


भाजपाचा पलटवार

तर, दुसऱ्याच दिवशी राज्य सरकारने दहीहंडीवरील निर्बंधाला आव्हान देण्याचे ठरवत सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडण्यासाठी विशेष कौंन्सिल तुषार मेहता यांची नियुक्तीही केली. एवढेच नव्हे, तर दहीहंडीपर्यंत या नियमांत बदल न झाल्यास विशेष अध्यादेश काढून सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचे ठरवून शिवसेनेचे आव्हान मोडीत काढले.


बाजारीकरणाचे करायचे काय?

उत्सव आणि त्याचे बाजारीकरण हा विषय आता नवीन राहिलेला नाही. उत्सावाच्या नावाने लाखो, कोटींच्या देणग्या 'उकळणे'. स्टेजवरचा झगमगाट, डि.जे.चा दणदणाट, सेलिब्रिटींच्या नाच-गाण्यांमुळे या उत्सवांचा पूर्वीचा सात्विकपणा हरवला आहे. आता राज ठाकरे यांच्या आवाहनाला किती मंडळे प्रतिसाद देतात हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.



हे देखील वाचा -

'दहिहंडीवरचे निर्बंध हटवा, नाहीतर अध्यादेश काढू'

उद्धव ठाकरे म्हणतात 'आधी गणेशोत्सव नंतर कायदा...'



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा