Advertisement

निवडणूक निकाल डिजिटल स्क्रीनवर दिसणार

मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर कुणाला किती मतदान मिळालं याची घोषणा केली जाणार आहे.

निवडणूक निकाल डिजिटल स्क्रीनवर दिसणार
SHARES

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी २३ मे ला होणार आहे. निवडणूक आयोगाने मतमोजणीसाठी अनेक प्रकारच्या खास सोयी केल्या आहेत. मुंबईत वाहतूक विभागाच्या डिजिटल बोर्डवर प्रथमच निवडणुकीचे निकाल दाखवले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांना मतमोजणीची माहिती तात्काळ मिळणं सोपं जाणार आहे. 


मतमोजणी ८ वाजता 

मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर कुणाला किती मतदान मिळालं याची घोषणा केली जाणार आहे. याशिवाय प्रत्येक फेरीची माहिती मुंबई वाहतूक विभागाने लावलेल्या डिजिटल स्क्रीनवर दाखवली जाणार आहे. मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणमुख्य गेटगार्डन गेट आणि मंत्रालयाच्या समोर सूचना व जनसंपर्क महासंचालनालयाच्या डिजिटल होर्डिंगवरही निवडणूक निकालांची माहिती दिली जाणार आहे. 


वेबसाइटवर निकाल

राज्य मुख्य निवडणूक आयोगाच्या  ceo.maharashtra.gov.in या वेबसाइटवरही निवडणूक निकाल बघता येणार आहेत. त्याचबरोबर टोल फ्री क्रमांक १९५० आणि नियंत्रण कक्षातील टेलिफोन क्रमांक ०२२-२२०४०४५१,५४ या क्रमांकावरही फोन करून निकाल जाणून घेता येतील. 




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा