Advertisement

मुंबईतील ५३ पत्रकारांनाही कोरोनाची लागण

डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांनंतर आता पत्रकारांनाही कोरोनाची (covid-19) लागण झाली आहे. मुंबईतील ५३ पत्रकारांना (mumbai journalist) कोरोनाची लागण झाली आहे.

मुंबईतील ५३ पत्रकारांनाही कोरोनाची लागण
SHARES

डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांनंतर आता पत्रकारांनाही कोरोनाची (covid-19) लागण झाली आहे. मुंबईतील ५३ पत्रकारांना (mumbai journalist) कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या आठवड्यात मुंबई महापालिका आणि टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून कोरोना चाचणीसाठी कॅम्प आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये १६८ जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यापैकी ५३ जणांची कोरोना टेस्ट पाॅझिटिव्ह आली आहे.  

हेही वाचा - माॅब लिंचिंगची घटना धार्मिक नाही, आग भडकवण्याचा प्रयत्न करू नका- उद्धव ठाकरे

टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद जगदाळे यांनी आयएएनएसला दिलेल्या माहितीनुसार, टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन आणि मंत्रालयातील पत्रकार संघाच्या विनंतीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकांराच्या कोरोना चाचणीसाठी महापालिकेला विशेष कॅम्प आयोजित करण्यास सांगितलं होतं. त्यानुसार मुंबई प्रेस क्लबजवळ या कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं. १६ आणि १७ एप्रिल रोजी पत्रकार आणि कॅमेरामन अशा १६८ जणांच्या कोरोना ()corona test चाचण्या घेण्यात आल्या. यातील ३० हून अधिक पत्रकारांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर काही पत्रकारांच्या कोरोना चाचण्यांचा अहवाल अजून यायचा आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्यापैकी बर्‍याच जणांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणंही आढळली नव्हती. पत्रकारांसाठी मुंबईत आणखी २ टेस्ट कॅम्प होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

इतर पत्रकारांचा चाचणी अहवाल आल्यानंतर कोरोनाबाधित पत्रकारांचा आकडा वाढू शकतो. तीव्र लक्षणे असलेल्या कोरोनाबाधितांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे तर सौम्य लक्षणे असलेल्या इतर सर्वांना पुढील १४ दिवस होम क्वारंटाईनच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पत्रकार आणि कॅमेरामन यांना सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करा, तसेच हात स्वच्छ धुण्यासाठी सॅनेटायझर्सचा वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

मुंबईत रिपोर्टिंग करणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह ५३ पत्रकारांच्या आरोग्याच्या सुविधेची आणि विलगिकरणाची व्यवस्था गोरेगाव मधील फर्न हॉटेलमध्ये करण्यात आली आहे.  पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर आणि पालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले यांच्या प्रयत्नाने ही व्यवस्था केली आहे. पालिकेचा आरोग्य विभाग पत्रकारांची काळजी घेत आहे. कोणीही परस्पर हॉटेलवर जाऊ  नये. पालिका प्रशासन पत्रकारांच्या क्वारंटाईनची व्यवस्था करीत आहे अशी माहिती विष्णू सोनवणे, अध्यक्ष, बृहन्मुंबई महानगर पालिका वार्ताहर संघ यांनी दिली.

हेही वाचा - महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढण्याचं 'हे' आहे कारण


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा