Advertisement

शेतकऱ्यांच्या लाॅन्ग मार्चसाठी मुंबईतील वाहतुकीत बदल

शेतकरी लाॅन्ग मार्चमुळे मुंबईत वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण होणार आहे. यावर तोडगा म्हणून मुंबई वाहतूक पोलिसांनी रविवार ११ मार्च रोजी मुंबईतील वाहतूक मार्गात मोठे बदल केले आहेत. या बदलांची माहिती वाहतूक विभागाकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबईकरांपर्यंत पोहोचवली जात आहे.

शेतकऱ्यांच्या लाॅन्ग मार्चसाठी मुंबईतील वाहतुकीत बदल
SHARES

विविध मागण्यांसाठी ७ मार्चला नाशिकवरून निघालेला शेतकऱ्यांचा लाॅन्ग मार्च मुंबईच्या वेशीवर येऊन धडकला आहे. शनिवारी रात्री मोर्चा मुलुंड चेकनाका इथं पोहचणार असून रविवारी सायनमध्ये दाखल होणार आहे. या लाॅन्ग मार्चमुळे वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण होणार आहे. यावर तोडगा म्हणून मुंबई वाहतूक पोलिसांनी रविवार ११ मार्च रोजी मुंबईतील वाहतूक मार्गात मोठे बदल केले आहेत. या बदलांची माहिती वाहतूक विभागाकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबईकरांपर्यंत पोहोचवली जात आहे.


'असे' आहेत बदल

११ मार्च (रविवार) ला सकाळी ९ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत पूर्व द्रूतगती मार्गावरील दक्षिण मार्गिका, आनंदनगर टोलनाका, मुलुंडपासून सोमय्या मैदान, सायनपर्यंत सर्व प्रकारच्या अवजड आणि माल वाहतुकीसाठी बंद असेल.

११ मार्च (रविवार) ला सकाळी ९ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत पूर्व द्रूतगती मार्गाने ठाणे येथून मुंबई शहरात येणारी सर्व प्रकारची अवजड आणि माल वाहतूक करणारी वाहनं कळवा, विटावा, एेरोली, वाशी खाडी पूलमार्गे वळवण्यात येतील.

११ मार्च (रविवार) ला सकाळी ९ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत पूर्व द्रूतगती मार्गाने मुंबई येथून ठाणे येथे जाणारी अवजड आणि माल वाहतूक वाशी खाडीपूल, एेरोली, विटावा मार्गे ठाणे येथे जाण्यासाठी वळवण्यात आली आहे.

तर, पूर्व द्रूतगती मार्गावरील दक्षिण मार्गावरील एक मार्गिका हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी मोकळी ठेवण्यात आली आहे. पण त्याचवेळी या मार्गावरील वाहनांची वेग मर्यादा ताशी २० किमी ठेवणं वाहनचालकांना बंधनकारक करण्यात आलं आहे.



हेही वाचा-

बळीराजाचं लाल वादळं मुंबईच्या दिशेनं...



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा