Advertisement

नवनीत राणांच्या 'डी' गँग कनेक्शनची मुंबई पोलिसांकडून चौकशी होण्याची शक्यता

शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी राणा जोडप्यांचे डी-गँगशी संबंध असल्याचा आरोप केला आहे.

नवनीत राणांच्या 'डी' गँग कनेक्शनची मुंबई पोलिसांकडून चौकशी होण्याची शक्यता
SHARES

शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (sanjay Raut) यांनी राणा जोडप्यांचे डी-गँगशी (D-Gang) संबंध असल्याचा आरोप केला आहे. खासदारानं डी गँग सदस्य युसूफ लकडावाला यांच्याकडून कर्ज घेतल्याचे राऊत यांनी ट्विट केले आहे. मात्र, राणा जोडप्यांकडून याबाबत अद्याप कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही.

राऊत यांनी ट्विट केलं की, नवनीत राणा (Navneet Rana) यांनी तुरुंगात मृत्यू झालेल्या युसूफ लकडावाला यांच्याकडून ८० लाखांचे कर्ज घेतले होते. याच लकडावालाला ईडीनं मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती आणि त्याचे डी गँगशीही संबंध होते. माझा प्रश्न आहे की, ईडीनं याची चौकशी केली का? हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे.

संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्या निवडणूक शपथपत्रातील कागदपत्रांच्या आधारे हे आरोप केले आहेत. शिवसेनेनं राणा दाम्पत्याविरोधात आक्रमक पाऊल उचलले असून केंद्रीय तपास यंत्रणांकडे नवनीत राणा यांच्या संदर्भातील कागदपत्रे सुपूर्द करून तपास करण्याची विनंतीही केली जाणार आहे.

महाविकास आघाडीकडून राणा दाम्पत्य आणि डी गॅंगच्या संबंधाबाबत चौकशी करण्याची मागणी करण्यात येण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून मुंबई पोलिसांकडे याबाबत लवकरच तक्रार दाखल केली जाण्याची शक्यता आहे. ही तक्रार दाखल झाल्यानंतर EOW कडून चौकशी सुरू करण्यात येणार आहे.

लकडावाला याचे कुख्यात दाऊद इब्राहिमशी संबंध असून अनेक गुन्हेगारी आणि दहशतवादी कारवायांशी त्याचा संबंध होता. तुरुंगात असतानाच तो मरण पावला होता. राणा यांनी लकडावालाकडून ही रक्कम कर्जरूपानं का? कशासाठी घेतली? त्याच्याशी काय संबंध होते? असे सवाल शिवसेनेने उपस्थित केले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील (Mumbai) राजकीय वर्तुळात हनुमान चालीसावरून राजकारण तापले आहे. जिथे गेल्या आठवड्यात खासदार नवनीत राणा यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरातील मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा वाचण्याची घोषणा केली. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला.

याशिवाय त्याच्याविरोधात आणखी एक एफआयआरही नोंदवण्यात आला आहे. त्या एफआयआरमध्ये राणा दाम्पत्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप करण्यात आला होता. कारण राणा दाम्पत्याने त्यांना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांशी गैरवर्तन केले होते.

दोघांना न्यायालयात हजर केले असता, पोलिसांनी त्यांची कोठडी मागितली, मात्र न्यायालयाने त्यांची कोठडी देण्यास नकार दिला.

दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. यानंतर नवनीत राणा यांना भायखळ्याच्या महिला कारागृहात तर त्यांचे पती रवी राणा यांना भायखळ्यापासून ४२ किमी अंतरावर असलेल्या नवी मुंबईतील तळोजा कारागृहात ठेवण्यात आले आहे.

राणा यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानं भाजपचे खासदार (BJP) विशेषतः नाराज झाले होते. नवनीत राणा यांच्या घोषणेनंतर त्यांना ज्या प्रकारे घरातून बाहेर पडू दिले जात नाही ते अतिशय आक्षेपार्ह आहे कारण ते खासदार आहेत आणि या घटनेमुळे खासदाराच्या विशेषाधिकाराचा भंग झाला आहे, असं भाजपनं म्हटलं.



हेही वाचा

मुंबई पोलिसांवर खोटे आरोप करणं नवनीत राणांना भोवणार?

पोलिस स्टेशनमध्ये चहा पितानाचा राणा दाम्पत्यांचा व्हिडिओ पोलिसांकडून जाहीर

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा