Advertisement

भाजपावर सामनातून बोचरी टीका


भाजपावर सामनातून बोचरी टीका
SHARES

मोदी लाटेच्या उदयापासून भाजप विजयाचा चौखूर उधळलेला वारु अशोक चव्हाणांनी रोखला आहे.’ अशी टीका भाजपावर ‘सामना’मधून करण्यात आली. त्याचसोबत सामनामधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचं देखील उद्धव ठाकरेंनी कौतुक केलं आहे.

‘भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला अपयश आलं आहे. फोडाफोडीचं आणि थैलीशाहीचं राजकारण सदासर्वकाळ यशस्वी होत नाही. हा या निवडणुकीचा सर्वात मोठा धडा आहे.’ अशी टीका देखील सामनातून करण्यात आली.


काँग्रेसमध्ये प्राण फुंकण्याचं काम

मोदी लाटेच्या उदयापासून भाजप विजयाचा चौखूर उधळलेला वारू अशोक चव्हाणांनी रोखला. भाजपच्या घोडदौडीला लगाम घातल्याचं विश्लेषण नांदेड महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर सुरू झालं आहे. आणखी दोन-चार दिवस त्यावर काथ्याकूट होत राहील. एक मात्र खरं की, निष्प्राण झालेल्या काँग्रेसमध्ये प्राण फुंकण्याचं काम नांदेड महापालिकेच्या निवडणुकीनं केलं आहे. नांदेडकरांनी दिलेला हा कौल तसा बुचकळ्यात टाकणारा असला तरी जनमताचा आदर राखून तो सर्वच राजकीय पक्षांना स्वीकारावा लागेल.


चव्हाणांची व्यूहरचना यशस्वी

राज्यभर गाजलेल्या नांदेड-वाघाळा महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची एकूणच व्यूहरचना यशस्वी ठरली आणि नांदेडमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं, हे आता मान्य करावंच लागेल. ८१ सदस्य संख्या असलेल्या नांदेड महापालिकेत ७० हून अधिक जागा जिंकून काँग्रेसने सर्वच राजकीय पक्षांना चकीत केलं. 



शिवसेनेला या निवडणुकीत म्हणावं तसं यश मिळाले नाही. हे अपयश म्हणा किंवा पराभव, त्याचा जो काय अभ्यास करायचा तो शिवसेना आपल्या पद्धतीने करेलच. मात्र एकाच वेळी अशोक चव्हाणांची काँग्रेस आणि साम, दाम, दंड, भेद या सर्व नीती-अनीतींचा अवलंब करणाऱ्या भाजपशी आमच्या सामान्य शिवसैनिकांनी त्याच्या परीने दोन हात केले, संघर्ष केला, हे आम्ही अभिमानाने सांगू शकतो.


तशीच ही धोबीपछाड

संपूर्ण देश काँग्रेसमुक्त करण्याचं उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवणाऱ्या आमच्या मित्रपक्षासाठी मात्र नांदेडचा निकाल अधिक धक्कादायक आहे. भाजपचा पराभव होऊ शकतो, असा स्पष्ट संदेश या निवडणुकीनं देशभर गेला आहे. पुन्हा हा पराभव साधासुधा नाही. दिल्ली विधानसभेत आम आदमी पार्टीने जशी भाजपला आपटी दिली होती तशीच ही धोबीपछाड आहे.




डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा