Advertisement

दादरमध्ये मनसे-काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले


दादरमध्ये मनसे-काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले
SHARES

बुधवारी सकाळी 11 वाजता दादरमध्ये काँग्रेसने फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला. या मोर्चाला सुरुवात होताच मनसे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी मनसे आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. काँग्रेसचे नेते राजन भोसले यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांकडून विरोध प्रदर्शन करण्यात आले.मालाडच्या सभेनंतर मनसे विभाग अध्यक्षाला मारहाण

मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी विनापरवानगी सभा घेऊन लोकांना कायदा हातात घेण्याचे आवाहन केल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. निरुपम यांच्या सभेनंतर मालाडमध्ये फेरीवाल्यांनी मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर हल्ला केला होता. या घटनेनंतर मनसेने फेरीवाल्यांचा विरोध करत ठिकठिकाणी राडा घातल्याने पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते.


काँग्रेस मनसेचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

मनसेचे गड असलेल्या दादरमध्ये बुधवारी काँग्रेसने फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला. त्याचवेळी मनसेचे कार्यकर्तेही तिथे आले आणि दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी आमने-सामने असलेले काँग्रेस आणि मनसेचे कार्यकर्ते आपआपसांत भिडले. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी काँग्रेसच्या 8 कार्यकर्त्यांना तर, मनसेच्या 10 ते 15 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement