Advertisement

महाराष्ट्रात वीज कंपन्या दर वाढवण्याची शक्यता

नितीन राऊत म्हणाले की, पुढील दोन दिवस राज्यासाठी महत्त्वाचे आहेत. तथापि, सरकार कोळशाची उपलब्धता वाढवण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे.

महाराष्ट्रात वीज कंपन्या दर वाढवण्याची शक्यता
(File Image)
SHARES

उष्णतेमुळे वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्याला पुरेसा कोळशाचा पुरवठा होत नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज संकटाचा सामना करू लागू शकतो असा इशारा दिला आहे.

बुधवार, ३० मार्च रोजी राऊत म्हणाले की, पुढील दोन दिवस राज्यासाठी महत्त्वाचे आहेत. मात्र, सरकार कोळशाची उपलब्धता वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. तरीही सर्व शक्यता पडताळून लोडशेडिंग करावं लागेल. आम्ही अशी परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करत आहे.

येत्या काही दिवसांत मुंबईत विजेचे दर वाढण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे. त्यासाठी वीज कंपन्या महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून (एमईआरसी) परवानगी घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

पत्रकारांशी बोलताना मंत्री म्हणाले की, गेल्या दोन दिवसांत कोळशाचा पुरवठा खूपच कमी झाला आहे. त्यामुळे राज्य वीज निर्मिती कंपनीसमोर विजेची वाढती मागणी पूर्ण करण्याचं आव्हान निर्माण झालं आहे, जर पुरेसा कोळसा पुरवठा होत नसेल तर राज्य प्रभावित होईल.

अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (एईएमएल), टाटा पॉवर कॉर्पोरेशन (टीपीसी) आणि बृहन्मुंबई इलेक्ट्रिकल सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) या वीज वितरण कंपन्या कोळशाचा तुटवडा आणि महागड्या खरेदीमुळे वीज दरवाढ करू शकतात. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, वीज कंपन्यांनी प्रस्तावित केलेली दरवाढ प्रति युनिट २५ ते ५० पैशांच्या दरम्यान असू शकते.

राऊत म्हणाले की, सरकार ३ ते ८ रुपये प्रति युनिट या दरानं वीज खरेदी करत आहे. मात्र, गतवर्षी राज्याला ते वीस रुपये प्रति युनिट दरानं खरेदी करावं लागेल. सध्याची वीज खरेदी दररोज १,५०० MW ते २,५०० MW दरम्यान आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) ने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, या वर्षी जानेवारीपर्यंत, त्याची एकूण थकबाकी रु. ६४,०९३ कोटी होती. ज्यापैकी रु. ९,१७६ कोटी एकट्या विविध सरकारांचे आहेत.

दुसरीकडे, रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरू झाल्यापासून, तेल, वायू, कोळसा आणि कच्चा माल म्हणून वापरल्या जाणार्‍या अनेक उत्पादनांचा पुरवठा लक्षणीयरित्या महाग होत असल्याचंही समोर आलं आहे.



हेही वाचा

गुढीपाडव्याला मास्कमुक्ती होणार की नाही? राजेश टोपे म्हणाले...

वीज कर्मचाऱ्यांनी संप घेतला मागे, चर्चेनंतर निघाला तोडगा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा