Advertisement

१५ ऑगस्टनंतर कुलगुरूंना नारळ?


१५ ऑगस्टनंतर कुलगुरूंना नारळ?
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालावरून विरोधकांच्या रडारवर असलेले कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची १५ ऑगस्टनंतर गच्छंती होणार असल्याची माहिती ‘मुंबई लाइव्ह’ला विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

कुलगुरूंना पदावरून हटविण्याचे अधिकार सरकारला नसले, तरी देशमुख कुलगुरूपदी राहावेत, अशी सरकारची जराही इच्छा नसल्याने राज्यपाल सी. विद्यासागर राव १५ ऑगस्टनंतर कुलगुरूंवर कारवाई करतील, अशी माहिती मुंबई लाइव्हला मिळाली आहे.


निकाल १५ ऑगस्टपर्यंत लागतील

५ ऑगस्ट उजाडला तरी मुंबई विद्यापीठाचे सगळे निकाल लागलेले नाहीत. त्यामुळे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी सांगितल्यानुसार १५ ऑगस्टपर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे.


विनोद तावडेही विरोधकांच्या रडावर

उशीरा लागणारे निकाल आणि विद्यापीठाचा भोंगळ कारभार यावरून कुलगुरू यांच्यासोबत शिक्षणमंत्री विनोद तावडे देखील विरोधकांच्या रडावर आहेत. युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी कुलगुरू आणि शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. तर विधान परिषदेत शिवसेना आमदार अनिल परब यांनी तावडेंच्या विरोधात हक्कभंग मांडला होता.




रवींद्र वायकर यांच्या विरोधात आंदोलन

एकीकडे शिवसेना विनोद तावडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत असताना नितेश राणे यांच्या स्वाभिमानी विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या विरोधात ‘शिवालय’ या शिवसनेच्या कार्यालया बाहेर आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी स्वाभिमानच्या काही कार्यकर्त्यांना अटक देखील केली होती.



हे देखील वाचा -

विद्यापीठ निकालांवरुन राज्यपाल विरूद्ध कुलगुरू?



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा