Advertisement

किरीट सोमय्यांनी फाडले फेरीवाल्याचे पैसे?

संभाजी मैदान परिसरात सचिन खरात भाजी विक्रीसाठी बसले होते. सकाळी ८ वाजताच्या सुमारास किरीट सोमय्या तिथं अाले, भाजीविक्रीचा धंदा बंद कर, येथे कुणीही धंदा करू नका, असं त्यांनी खरात यांना बजावलं. बोलताना अचानक सोमय्यांचा राग अनावर झाला. ग्राहकाने सचिन खरात यांना दिलेले १५० रुपये सोमय्यांनी हिसकावून घेतले अाणि फाडून टाकले.

किरीट सोमय्यांनी फाडले फेरीवाल्याचे पैसे?
SHARES

अापल्या बेधडक बोलण्याने कायम चर्चेत राहणारे खासदार किरीट सोमय्या पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले अाहेत. मुलुंडच्या संभाजी मैदानाजवळील फेरीवाल्यांना हटविण्याच्या प्रयत्नात किरीट सोमय्या यांचं रागावरील नियंत्रण सुटलं. त्यातच एका फेरीवाल्याला धक्काबुक्की करून त्याच्या हातातील पैसे हिसकावून घेत सोमय्या यांनी हे पैसे फेरीवाल्याच्याच तोंडावर फेकल्याचा प्रकार समाेर अाला अाहे.


नेमकं काय घडलं?

संभाजी मैदान परिसरात सचिन खरात भाजी विक्रीसाठी बसले होते. सकाळी ८ वाजताच्या सुमारास किरीट सोमय्या तिथं अाले, भाजीविक्रीचा धंदा बंद कर, येथे कुणीही धंदा करू नका, असं त्यांनी खरात यांना बजावलं. बोलताना अचानक सोमय्यांचा राग अनावर झाला. ग्राहकाने सचिन खरात यांना दिलेले १५० रुपये सोमय्यांनी हिसकावून घेतले अाणि फाडून टाकले. सोमय्यांच्या सांगण्यावरून १२०० रूपयांचा दंडही त्या भाजीवाल्याला भरावा लागला.


अदखलपात्र गुन्हा दाखल

या प्रकारानंतर सचिन खरात याने पोलिसांकडे धाव घेत किरीट सोमय्यांविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. यापूर्वीही नवघर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याला धमकावल्याप्रकरणी खासदार किरीट सोमय्या अडचणीत सापडले होते.


 सोमय्यांविरुद्ध राग

भाजी विक्रेता सचिनच्या नोटा फाडल्या म्हणून अनेकांनी सोमय्यांविरुद्ध राग व्यक्त करून सचिनला सहानुभूती देण्यासाठी पोलीस ठाण्यात सामान्य नागरिकांनी गर्दी केली होती. त्यात राजकीय मंडळींचाही समावेश होता. त्यामुळ परिसरातील वातावरण काही वेळ तणावाचं बनलं होतं.


हेही वाचा -

'किरीट सोमय्या बिल्डरचे दलाल'

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा