मुंबई विकास आघाडीचे ‘महागठबंधन’

  Mumbai
  मुंबई विकास आघाडीचे ‘महागठबंधन’
  मुंबई  -  

  नरिमन पॉईंट – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आठ घटक पक्षांनी एकत्र येत मुंबई विकास आघाडीच्या नावाखाली महागठबंधन केलं आहे. मंगळवारी याची अधिकृत घोषणा नरिमन पॉईंट येथील जनता दलाच्या कार्यालयात बीआरएसपीचे डॉ. सुरेश माने यांनी केली.

  बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (बीआरएसपी), जनता दल (सेक्युलर), जनता दल (युनायटेड), रिपब्लिकन पक्ष (खोब्रागडे), डेमोक्रेटिक रिपब्लिकन पार्टी, अवामी विकास पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (कांबळे) आणि इतर पक्षांची आघाडी निर्माण झाली आहे. मुंबईत 150 जागांवर एकमताने निवडणूक लढवणार आहेत. 1 फेब्रुवारीला आघाडीचा विस्तृत जाहीरनामा आणि उर्वरित उमेदवारांची यादी घोषित कऱण्यात येणार असल्याचे माने यांनी सांगितले.

  Loading Comments
  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.