मुंबई बुडणारच - संजय निरूपम

Mumbai
मुंबई बुडणारच - संजय निरूपम
मुंबई बुडणारच - संजय निरूपम
मुंबई बुडणारच - संजय निरूपम
See all
मुंबई  -  

मुंबईतील नाल्यांच्या सफाईचे काम योग्यप्रकारे सुरू असल्याचा दावा केला जात असतानाच काँग्रेसने सोमवारी केवळ दोनच नाल्यांची पाहणी करत टक्केवारीचे दावेच फोल ठरवले. काँग्रेसने, वडाळा आणि शिवाजी नगरमधील दोन नाल्यांची सफाई झालीच नसल्याचे दाखवून दिले. मुंबईतील बहुतांशी नाल्यांची स्थिती अशीच असून, आजमितीस 25 टक्क्यांपेक्षा जास्त नालेसफाई झालेलीच नाही, असा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. नालेसफाईच्या नावावर हातसफाई सुरू आहे. त्यामुळे यंदाही मुंबई बुडणारच असा दावा करत काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला. छोट्या नाल्यांच्या सफाईत घोटाळा होत असल्याने त्याची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

मुंबईतील नालेसफाईचे काम 90 टक्के झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केल्यानंतर काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम आणि महापालिका विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी मुंबईच्या काही भागांमधील नाल्यांची अचानक पाहणी केली. आजवर प्रशासनाला पाहून किंवा त्यांनी सुचवल्याप्रमाणे नाल्यांची पाहणी केली जाते. परंतु निरुपम आणि रवी राजा यांनी नाल्यांची अचानक पाहणी करत प्रशासनाच्या दाव्यांची आणि सत्ताधारी पक्षाची पोलखोल केली. यावेळी नगरसेवक विठ्ठल लोकरे, पुष्पा कोळी, सुप्रिया सुनील मोरे, सुफियान वणू यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

निरुपम आणि रवी राजा यांनी प्रथम वडाळा येथील कोरबा मिठागर नाल्याला भेट दिली. या नाल्याची पाहणी केली असता हा नाला साफच झाला नसल्याचे आढळून आले. या नाल्यात प्रचंड कचरा आणि गाळ दिसून आला. हा नाला मोठा असताना तसेच जेसीबी जाण्यास, वाहने जाण्यास रस्ता असताना या नाल्याचे काम कंत्रादाराऐवजी एनजीओच्या माध्यमातून सुरू आहे. या नाल्यातील गाळ गेली अनेक वर्षे काठावर काढून ठेवला आहे. ज्यामुळे कचऱ्याचे डम्पिंग ग्राऊंड बनले आहे. महापालिकेच्या नाल्याची सफाई झाली नसून, आम्ही 1 जून नंतर पुन्हा या नाल्याची पाहणी करू असे निरुपम यांनी यावेळी सांगितले.

शिवाजीनगर ,रफिकनगर नाला आजही कचऱ्याने भरलेला असून, सफाईचे काम तातडीने आजच चालू करण्यात आले होते. या नाल्याशेजारील झोपड्या काही दिवसांपूर्वी तोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे नाल्याशेजारील भाग मोकळा झाला आहे. परंतु हा नाला योग्यप्रकारे साफ केला जात नाही, असे स्थानिक रहिवाशांनी निरुपम यांना सांगितले. या नाल्या शेजारीच गाळ काढून टाकला आहे आणि तो उचलला जात नाही. या दोन्ही नाल्यांच्या पाहणीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना निरुपम यांनी नालेसफाईचा भ्रष्टचार उघडकीस आल्यानंतर या कामात सुधारणा झाली नसल्याचे सांगितले. नालेसफाईच्या कामात कोट्यवधी रुपये दरवर्षी खर्च केले जात असले तरी या कामात हातसफाईच होत असल्याचा आरोपी त्यांनी यावेळी केला. सत्ताधारी पक्ष मुंबईकरांना नाले स्वच्छ करून देऊ शकत नाही, हे केवळ दोनच नाल्यांच्या कामांवरून लक्षात येते. शिवसेना आणि भाजपा हे जबाबदारी झटकत असले तरीही ही जबाबदारी दोघांची आहे. त्यांना ही नालेसफाई करता न आल्यामुळे त्या दोघांनी मुंबईकरांची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. पाऊस कोणत्याही क्षणाला पाऊस पडू शकतो. पण नालेसफाई पूर्ण झालेली नाही. 25 टक्के एवढेच नालेसफाईच काम झाले आहे. त्यामुळे नालेसफाई अभावी पाणी साचून मुंबई बुडणारच असा दावा निरूपम यांनी केला. नाल्यातील गाळ काठावरच आहे. तो गाळ पुन्हा नाल्यात जातो. पण त्याची विल्हेवाट कंत्राटदार लावत नाहीत. मुंबई पाण्याखाली जाण्याची भीती आहे, असे त्यांनी सांगितले. त्याने शिवसेना आणि प्रशासनाने सफाईची टक्केवारी सांगण्याऐवजी जे दिवस उरलेत त्या दिवसात कंत्रात्र दारांकडून सफाईचे काम करून घ्यावे, असे त्यांनी सांगितले.

नालेसफाई घोटाळ्याची चौकशी पूर्ण झाली पण कोणाला शिक्षा नाही. पण सध्या सुरू असलेल्या छोट्या नाल्यांच्या सफाईत घोटाळा झाला असून, त्याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी निरुपम यांनी केली. यंदा गाळ काढण्याचे पैसे वाढवून दिले तरी काम होत नाही. काही कंपन्या नाव बदलून परत आलेत यासर्वांची चौकशी व्हायला हवी.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.