बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त शिवतीर्थावर गर्दी

Dadar , Mumbai  -  

दादर - हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे... मराठी माणसांच्या मनात असलेलं राजकारणातलं एक आदरणीय नाव. दिवंगत बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त शिवाजीपार्क येथे शिवसैनिकांची गर्दी पाहायला मिळाली. या वेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनीही उपस्थिती लावली. मुंबईप्रमाणेच ग्रामीण भागातून आलेल्या अनेक शिवसैनिकांनी स्मृतिस्थळावर जाऊन बाळासाहेबांना अभिवादन केलं. यातच नांदगावच्या दौंडमधून आलेले शिवसैनिक सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. ज्येष्ठ नेते आणि तमाम शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या जयंतीदिनी शिवाजीपार्कवर हजेरी लावत आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली.

Loading Comments