Advertisement

पोलिसांची ८ हजार रिक्त पदे भरणार, गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

गृहविभागाच्या माध्यमातून लवकरच पोलिसांच्या ७ ते ८ हजार रिक्त पदांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. ही पोलीस भरती झाल्यास राज्यातील पोलिसांवरील ताण काही प्रमाणात कमी होऊ शकेल.

पोलिसांची ८ हजार रिक्त पदे भरणार, गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
SHARES

गृहविभागाच्या माध्यमातून लवकरच पोलिसांच्या ७ ते ८ हजार रिक्त पदांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. ही पोलीस भरती झाल्यास राज्यातील पोलिसांवरील ताण काही प्रमाणात कमी होऊ शकेल. 

दिवंगत जे.डी. पाटील उपाख्य बाबासाहेब सांगळूदकर यांच्या ५१व्या पुण्यतिथीनिमित्त दर्यापूर येथील कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात गृहमंत्री अनिल देशमुख बोलत होते.

हेही वाचा- तर, शिवसेना नाव बदलून ठाकरे सेना करा, उदयराजेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान

सध्या मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे पोलिसांवरील ताण वाढत आहे. हा ताण कमी करण्यासाठी गृहविभागाच्या माध्यमातून पोलिसांच्या रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे पोलीस भरतीसह विविध स्पर्धा परिक्षांसाठी ग्रामीण भागातील तरुणांनी अभ्यासात सातत्य ठेवत तयारी करायला हवी असं देशमुख यांनी सांगितलं. 

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकार पावले उचलत असून राज्यातील महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचंही ते म्हणाले. विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्येबाबत गृहमंत्री देशमुख यांनी चिंता व्यक्त केली. पालकांनी आपल्या मुलांवर अवास्तव अपेक्षांचं ओझं लादू नये असं आवाहन त्यांनी केलं. 

हेही वाचा- सरकारी कर्मचाऱ्यांना मृत्यूपर्यंत घर? गृहनिर्माण मंत्र्यांचं आश्वासन

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा