• भाजपात इनकमिंग जोरात
SHARE

सीएसटी - जसजशी महापालिका निवडणुकीची तारीख जवळ येऊ लागलीय, तसतसे पक्षांतर करण्याचं प्रमाणही वाढू लागलंय. मनसेचे विक्रोळीचे माजी आमदार मंगेश सांगळे, काँग्रेसचे विलेपार्लेचे माजी आमदार कृष्णा हेगडे, फिल्म अभिनेता दिलीप ताहीर, शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश नाईक, शिवसेनेच्या नगरसेविका लीना शुक्ला, काँग्रेसचे परमिंदर भामरा आणि भालचंद्र आमुरे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आशीष शेलार यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. तसचं युतीबाबत अजून चर्चा सुरू आहे, युती व्हावी अशी आमची भूमिका आहे. शिवसेनेच्या वचननाम्यावर वक्तव्य करणार नाही. जर युती झाली तर एकत्र वचननामा प्रसिद्ध करु, अशी माहिती आशिष शेलार यांनी या वेळी दिली. तसंच 60 जागेचा प्रस्ताव भाजपासाठी अपमानकारक आहे. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे युतीबाबत ठरवणार असल्याचं ही त्यांनी या वेळी सांगितलं.

भाजपा प्रवेशानंतर नेत्यांच्या प्रतिक्रीया

काँग्रेसकडून म्हाडा कंत्राटदार आणि गुन्हेगारांनाच तिकीटं दिलं जातं, याबद्दल वरिष्ठ नेत्यांनाही कळवलं तरी काहीही फायदा झाला नाही .

- कृष्णा हेगडे 

पक्षांमध्ये मधल्या काळात काही घटना घडल्या, त्यामुळे मी आज भाजपात प्रवेश करत आहे. राज ठाकरे यांच्याबाबत तक्रार नाही. त्यांच्यामुळेच मी आज इथंपर्यंत पोहचलो आहे .

-मंगेश सांगळे 

देशात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. तसंच मी आधीपासून भाजपाचा समर्थक राहिलो आहे. त्यामुळे भाजपात प्रवेश केला.

-दिलीप ताहीर

मी पक्षासाठी काम केलं, पण दोन वेळा मला पक्षाकडून न्याय मिळाला नाही. आता भाजपाच्या माध्यमातून माझं काम बोलेल.

-रमेश नाईक 

संबंधित विषय
ताज्या बातम्या