नाना आंबोलेंचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

 Parel
नाना आंबोलेंचा शिवसेनेला जय महाराष्ट्र
Parel, Mumbai  -  

मुंबई - युवासेनेचे अमर पावले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर आता परळ-लालबागमधून शिवसेनेला अजून एक धक्का बसला आहे. नगरसेवक आणि माजी बेस्ट समितीचे अध्यक्ष नाना आंबोले यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला. नाना आंबोले यांचा वॉर्ड महिलांसाठी आरक्षित झाल्यानं पत्नीसाठी उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, तिकीट न मिळाल्यामुळे नाना आंबोले भाजपात सामिल झाल्याचं सागितलं जात आहे.

Loading Comments