मुंबईसह राज्यभर स्वच्छता अभियान मोहीम

 Mumbai
मुंबईसह राज्यभर स्वच्छता अभियान मोहीम

कांदीवली - श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने नानासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या अनुयायांनी मुंबईसह सपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता अभियान राबवले आहे. याची सुरूवात त्यांनी कांदीवलीपासून केली. 

खासदार गोपाळ शेट्टी यांनी देखील सहभाग घेत हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहिमेस सुरुवात केली.

 'आपण सगळ्यांनी स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचं असल्याचे गोपाळ शेट्टी यांनी यावेळी सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील स्वच्छतेसाठी पुढाकार घेतात आपण त्यांना साथ द्यायला हवी असंही ते यावेळी म्हणाले.

Loading Comments