राणेंचं 'मिशन कोकण'

  Churchgate
  राणेंचं 'मिशन कोकण'
  मुंबई  -  

  मुंबई - पक्ष आणि राज्यातल्या पक्षनेतृत्वावर नाराज असलेले ज्येष्ठ काँग्रेस नेता नारायण राणे आता सिंधुदुर्ग दौऱ्यावर निघाले आहेत. एरवी विधिमंडळ अधिवेशनाला सुट्टी असतानाच्या काळात नारायण राणे यांचा सिंधुदुर्ग दौरा ही बातमी ठरली नसती. पण राणे यांच्या पक्षत्यागाची चर्चा सुरू असताना त्यांची सिंधुदुर्गवारी महत्त्वाची ठरते. एकीकडे नारायण राणे कणकवली मुक्कामी आपल्या कार्यकर्त्यांशी गाठीभेटी करणार आहेत, तर दुसरीकडे त्यांचे पुत्र माजी खासदार निलेश राणे रत्नागिरीत तळ ठोकून आहेत. दुसरे राणेपुत्र आमदार नितेश राणेसुद्धा शनिवारी कोकणच्या दिशेने रवाना होणार आहेत. मंगळवारपर्यंतच्या मुक्कामात राणे कुटुंब महत्त्वाच्या भेटीगाठी करणार आहेत. शिवसेनेतून बाहेर काढल्यानंतरही नारायण राणे यांनी विश्वासातल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता, हा इतिहास राणेसमर्थक आणि राणेविरोधकांच्या लक्षात असेलच.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.