Advertisement

'हे' ३ नेते करणार राजकीय घटस्थापना!


'हे' ३ नेते करणार राजकीय घटस्थापना!
SHARES

पितृपक्षाचा पंधरवडा संपल्यानंतर गुरुवारी घटस्थापना होत आहे. असे म्हणतात की पितृपक्षात शुभ कामे करता येत नाहीत. त्यामुळे बहुतेकजण पितृपक्ष संपल्यानंतर शुभ कामांना सुरुवात करतात. राजकारणीही याला अपवाद नाहीत. त्यामुळेच की काय गुरुवारी घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.


राणे ठरवणार नवी राजकीय दिशा?

काँग्रेसमध्ये नाराज असलेले नारायण राणे भाजपामध्ये जाणार, अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. मात्र 21 सप्टेंबरला म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी भविष्यातली दिशा स्पष्ट करणार असल्याची घोषणा खुद्द काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी सोमवारी सिंधुदुर्गमध्ये केली होती. राणेंनी अजून तरी त्यांच्या संभाव्य भाजपा प्रवेशबद्दलचे गूढ कायम ठेवत शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे राणे काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.


राज ठाकरेंची फेसबुक एण्ट्री

गेल्या काही निवडणुकीमध्ये मंदावलेल्या मनसेच्या इंजिनाची गती वाढवण्यासाठी आता राज ठाकरे मैदानात उतरले आहेत. त्याचीच सुरुवात ते घटस्थापनेपासून करत आहे. घटस्थापनेचा मुहूर्त साधत राज ठाकरेंनी फेसबुकवर एण्ट्री घेतली आहे. राज ठाकरेंच्या फेसबुक एण्ट्रीचा टिझर नुकताच मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन लॉन्च देखील करण्यात आला आहे.

">

सदाभाऊंच्या नव्या पक्षाची घोषणा

राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर त्यांनी आता भाजपच्या वळचणीला न जाता आपली वेगळी चूल मांडण्याचा निर्णय जाहीर केला होता. शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी आपण नवीन संघटना उभारणार असून, 21 सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथे नव्या पक्षाच्या नावाची घोषणा करणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी जाहीर केले होते. 

त्यामुळे सदाभाऊंच्या या नव्या संघटनेचे नाव काय असेल? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच 30 सप्टेंबर रोजी दसऱ्याला इचलकरंजीत शेतकऱ्यांचा मेळावा घेणार असल्याची घोषणाही त्यांनी केली होती.


हेही वाचा - 

नारायण राणेंना शिवसेनेची ऑफर देणारी ती व्यक्ती कोण?



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा