Advertisement

हीच का उपकाराची परतफेड?, नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न

शिवसेनेने कोरोना काळात सिंधुदुर्गात ९०१ तर रत्नागिरीमध्ये १५६१ मृत्यू दिले. याला संपूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहेत, असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे.

हीच का उपकाराची परतफेड?, नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न
SHARES

कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे दोन्ही जिल्हे शिवसेनेचे बालेकिल्ले समजले जातात. येथील स्थानिकांनी नेहमीच प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेला साथ दिली आहे. असं असूनही शिवसेना सत्तेत असून देखील या जिल्ह्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी केला आहे. या दोन जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी हे मत मांडलं आहे.

नारायण राणे यांनी नुकताच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना (coronavirus) स्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. त्याआधी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील राणे यांची भेट घेऊन या जिल्ह्यातील परिस्थिती समजून घेतली होती. 

हेही वाचा- ही दंडुकेशाही राज्यात चालणार नाही, चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा

सिंधुदुर्ग-रत्नागिरीने शिवसेनेला स्थापनेपासून साथ केली, त्याबदल्यात शिवसेनेने (shiv sena) कोरोना काळात सिंधुदुर्गात ९०१ तर रत्नागिरीमध्ये १५६१ मृत्यू दिले. याला संपूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहेत, असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे.

सोबतच दोन्ही जिल्ह्यात डॉक्टर नाही, नर्स, वार्डबॉय, औषध पुरवठा व ऑक्सिजन नाही. एवढ्या वर्षाच्या निष्ठेनंतर सिंधुदुर्ग व रत्नागिरीच्या पदरी मृत्यू. मा. मुख्यमंत्री हीच का उपकाराची परतफेड? असा प्रश्न देखील उद्धव ठाकरे यांना उद्देशून केला.

कोकणातील विविध मुद्द्यांवरून सध्या भाजपकडून शिवसेनेला लक्ष्य करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच आलेल्या चक्रीवादळामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांचं मोठं नुकसान झालं. या जिल्ह्यांना राज्य सरकारने तातडीने मदत करावी, असं आवाहन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केलं होतं. ज्या प्रकारे आतापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत स्थानिकांनी शिवसेनेला भरभरून सहकार्य केलं. खासदार, आमदार, नगरसेवक निवडून दिले, सत्तास्थानी बसवलं. त्याचपद्धतीने आता शिवसेनेने कोकणवासियांना भरभरून मदत करावी, अशी अपेक्षा फडणवीस यांनी यावेळी बोलून दाखवली होती.

(narayan rane slams uddhav thackeray over covid 19 infection in sindhudurg and ratnagiri)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा