Advertisement

“राजकीय कारणांमुळेच सुशांत प्रकरणी बिहारमध्ये गुन्हा दाखल”

केवळ राजकीय कारणांमुळेच सुशांत सिंह प्रकरणी बिहारमध्ये गुन्हा नोंदवण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

“राजकीय कारणांमुळेच सुशांत प्रकरणी बिहारमध्ये गुन्हा दाखल”
SHARES

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant singh Rajput) आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत असताना बिहारमध्ये गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास CBI कडे देण्यात आला. केवळ राजकीय कारणांमुळेच हा गुन्हा नोंदवण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

यासंबंधी बोलताना नवाब मलिक म्हणाले, सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येला एक वर्ष पूर्ण झालं असून या प्रकरणात ज्याप्रकारे राजकारण झालं ते सर्वांसमोर आहे. मुंबई पोलीस तपास करत असताना राजकीय कारणांमुळे बिहारमध्ये गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास CBI कडे देण्यात आला. मात्र त्यातून निष्पन्न काय झालं? 

सुशांतसिंग राजपूत प्रकरणामध्ये आत्महत्येशिवाय आणखी काही आहे का? याची माहिती आजपर्यंत CBI कडून देण्यात आलेली नाही. सुशांतसिंगच्या नावाने भाजपला बिहार निवडणूक लढवायची होती म्हणून सीबीआयला पुढे करून महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचं कटकारस्थान रचण्यात आलं.

हेही वाचा- सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास कुठपर्यंत?

एका वर्षानंतर देखील सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला नाही. जर त्याने आत्महत्या केली नव्हती, तर मग त्याचे मारेकरी कोण? हे सीबीआयने जनतेला सांगितलं पाहिजे, अशी मागणी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला १४ जून २०२१ रोजी एक वर्ष झालंय. सुशांतनं वांद्र्याच्या फ्लॅटमध्ये एक वर्षापूर्वी (death anniversary) आत्महत्या केली होती. 

टीव्ही मालिकेत अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर सिनेजगतामध्येही चांगलं नाव कमावणाऱ्या सुशांतनं १४ जून २०२० रोजी आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण तर समोर आलं नाही. पण यावरून बॉलिवूडमधील घराणेशाही, रीया चक्रवर्तीसोबत ब्रेकअप अशी कारणं चर्चेत राहिली.

(nawab malik comment on sushant singh rajput suicide case and bihar election politics)

हेही वाचा- Sushant Singh Rajput Death Anniversary : बॅग्राऊंड डान्सर ते बॉलिवूड स्टार,

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा