'पंतप्रधानांनी जनतेचा विश्वास गमावला'

  Vidhan Bhavan
  'पंतप्रधानांनी जनतेचा विश्वास गमावला'
  मुंबई  -  

  नरिमन पॉईंट- राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा टीका केलीय. "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना संबोधित करत असतात. मात्र सध्या नरेंद्र मोदी हे आपल्या कोणत्याच शब्दांवर कायम राहत नसल्याने त्यांनी जनतेमधील आपली विश्वासार्हता गमावलीय. त्यामुळे आता त्यांनी मन की बात हा कार्यक्रम बंद केलेला बरा," अशी टीका मलिक यांनी केलीय.

  पंतप्रधानांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला तेव्हा त्यांनी देशाला संबोधित करताना म्हटलं होतं की, "जनतेला आता 4 हजार रूपयांपर्यंतची रक्कम बँक आणि पोस्ट ऑफिसातून बदलता येईल. तसंच ३० डिसेंबरपर्यंत चलन बदलाची मर्यादा असेल. काही कालावधीनं 4 हजारांची मर्यादा वाढवली जाईल, अशी आश्वासनं दिली होती. पण पंतप्रधानांनी आपल्या वचनापासून घुमजाव केलंय. त्यामुळे त्यांनी आपली जनतेतील विश्वासार्हता गमावलीय.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.