राष्ट्रवादी काँग्रेसची २० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

जळगाव, अकोला, वाशिम, अमरावती, गडचिरोली, यवतमाळ, परभणी, औरंगाबाद, नाशिक, रायगड, पुणे, बीड, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यातील उमेदवारांचा या दुसऱ्या यादीत समावेश आहे.

SHARE

राष्ट्रवादी काँग्रेसने गुरूवारी आपली २० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. बुधवारी रात्री उशिरा पहिली यादी जाहीर केल्यानंतर गुरूवारी लगेच दुसरी यादी जाहीर करण्यात आली. या यादीत छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांना नांदगावमधून तर सोलापूरमधील माढातून बबनदादा शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

 जळगाव, अकोला, वाशिम, अमरावती, गडचिरोली, यवतमाळ, परभणी, औरंगाबाद, नाशिक, रायगड, पुणे, बीड, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यातील उमेदवारांचा या दुसऱ्या यादीत समावेश आहे.  राष्ट्रवादीने बुधवारी २० विद्यमान आमदारांचा समावेश असलेल्या ७७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. दुसऱ्या यादीत ५ विद्यमान आमदारांचा समावेश आहे. तर १५ नवीन चेहऱ्यांना राष्ट्रवादीने संधी दिली आहे. हेही वाचा -

कुख्यात गुंड छोटा राजनचा भाऊ निवडणुकीच्या रिंगणात
संबंधित विषय
ताज्या बातम्या