अनोख्या पद्धतीने भरला उमेदवारी अर्ज

Mumbai  -  

भोईवाडा -  उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे सगळीकडे उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू होती. मात्र भोईवाडामध्ये अनोख्या पद्धतीने उमेदवारी अर्ज भरण्यात आला. ही दृश्य पाहून तुम्हाला वाटेल की हा रस्ते साफसफाई, खड्डे बुजवण्याचा काही तरी कार्यक्रम आहे. मात्र तुम्ही समजताय तसं काही नाही. उमेदवारी दाखल करताना भोईवाडामधील वॉर्ड क्रमांक 202 च्या राष्ट्रवादीच्या उमा भास्करन यांनी ही अनोखी रॅली काढली होती. या रॅलीतून त्यांनी पालिकेतील सत्ताधाऱ्यांची पोलखोल केलेय.

रस्त्यावरील खड्डे, कचरा यांसारख्या अनेक समस्यांनी मुंबईकर त्रस्त झालेत आणि याचाच वापर आता विरोधक मतदारांना आकर्षित करण्यासाठी करतायेत. त्याचीच सुरूवात अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने उमेदवारी अर्ज भरण्याच्या रॅलीपासून झालीय. येत्या काळात विरोधक अनेक मुद्दे घेऊन सत्ताधाऱ्यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न करणार आहेत.

Loading Comments