Advertisement

उदयनराजेंच्या उमेदवारीला जोरदार विरोध?

बैठकीत एका गटाने त्यांच्या नावाला जोरदार विरोध करत रामराजे निंबाळकर यांचं नाव पुढं केल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उदयनराजे यांना तिकीट देतात की निंबाळकर यांना याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

उदयनराजेंच्या उमेदवारीला जोरदार विरोध?
SHARES

सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी कुणाला द्यायची? यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील मुख्यालयात रविवारी दुपारी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला साताऱ्यातील राष्ट्रवादीचे सध्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही निमंत्रीत करण्यात आलं होतं. परंतु वाहतूककोंडीमुळे ते बैठकीला वेळेत पोहोचू शकले नाहीत. तर दुसऱ्या बाजूला बैठकीत एका गटाने त्यांच्या नावाला जोरदार विरोध करत रामराजे निंबाळकर यांचं नाव पुढं केल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उदयनराजे यांना तिकीट देतात की निंबाळकर यांना याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.


बैठकीमागचं कारण काय?

मागील काही दिवसांपासून उदयनराजे भोसले यांच्याबाबत पक्षातून नाराजीचा सूर असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच पुढील लोकसभा निवडणुकीत उदयनराजे यांच्या ऐवजी दुसऱ्या उमेदवाराला तिकीट देण्यात यावं, अशी मागणी सध्या राष्ट्रवादीतील एक गट करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यावर पवार यांनी स्पष्टपणे भाष्य केलेलं नसलं, तरी ही नाराजी लक्षात घेता सातारा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास आणखी कोण इच्छुक आहे, हे जाणून घेण्यासाठी पवार यांनी रविवारी या बैठकीचं आयोजन केलं होतं.


उदयनराजे वाहतूककोंडीत अडकले

या बैठकीला उदयनराजे यांनाही निमंत्रण देण्यात आलं होतं. परंतु वाहतूककोंडीमुळे बैठक संपल्यानंतर ते मुंबईतील राष्ट्रवादीच्या मुख्यालयात पोहोचले. या बैठकीत उदयनराजे यांच्या उमेदवारीला जोरदार विराेध झाल्याचं म्हटलं जात असून त्यांच्या ऐवजी रामराजे निंबाळकर किंवा अन्य उमेदवार देण्याची मागणीही झाल्याचं म्हटलं जात आहे.


पवारांच्या हाती निर्णय

बैठकीनंतर पोहोचलेले उदयनराजे यांनी पवार यांची भेट घेतली असली, तरी आता उदयनराजे, निंबाळकर की तिसराच उमेदवार यापैकी एकाची निवड पवार यांना या मतदारसंघासाठी करायची आहे. तेव्हा पवार यांच्या निर्णयावरच उदयनराजे यांची उमेदवारी अवलंबून असणार आहे.


वाहतूककोंडीमुळे मला बैठकीला पोहोचायला उशीर झाला. परंतु मी पवारसाहेबांचे आशीर्वाद घेतले आहेर. जसे पवार साहेबांचे सर्व पक्षात मित्र आहेत, तसेच माझेही सर्वच पक्षांत मित्र आहेत. माझ्या उमेदवारीबाबत पक्ष जो निर्णय घेईल, तो मला मान्य असेल.
-उदयनराजे भोसले, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस


हेही वाचा-

महाअाघाडीत मनसेला घेण्याचा राष्ट्रवादीचा प्रस्ताव; काँग्रेसचा विरोध

आंबेडकरांनी आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नये- शरद पवार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा