राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार

 Mumbai
राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार

सीएसटी - मुंबई महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार नरिमन पॉईंट येथील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात मंगळवारी झाला. खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रवक्ते नवाब मलिक, शहराध्यक्ष सचिन अहिर उपस्थित होते.

या वेळी सुनील तटकरे यांनी निवडणुकी दरम्यान करण्यात आलेल्या जाहिरातींवर टीका केली. तसेच "ग्रामीण भागात, मुंबई आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीच्या जागा कमी आल्या. पण मिळालेले यशही कौतुकास्पद आहे, असे पवार यांनी सागितले. निवडणुकीच्या निकालावर विचार मंथन करण्यासाठी 4 मार्चला राष्ट्रवादी कॉग्रेसची महत्त्वाची बैठक शरद पवारांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहितीही तटकरे यांनी दिली.

Loading Comments