मुंबईत काँग्रेस स्वत:ला मोठा भाऊ समजतंय - तटकरे

 Pali Hill
मुंबईत काँग्रेस स्वत:ला मोठा भाऊ समजतंय - तटकरे
Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - आघाडी करण्याबाबत राष्ट्रवादीनं अनुकुलता दाखवली होती. मात्र त्याला काँग्रेसनं प्रतिसाद दिला नाही. तसेच अजूनही काँग्रेससोबत आघाडी करण्याची तयारी असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणालेत. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुंबई महानगर पालिकेसाठी आघाडी करणार नाही, हे आधीच स्पष्ट केलंय. मुंबईत काँग्रेस स्वतःला मोठा भाऊ समजतंय त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, आम्ही चर्चेसाठी तयार असल्याचंही तटकरेंनी सांगितलं. अकोला पालिकेतील तब्बल 10 नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये काँग्रेसचे 6, यूडीएफ 1, सपा 1, भारिप 1 आणि एका अपक्ष नगरसेवकाने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते.

Loading Comments