Advertisement

'यापुढे आमचे नेते सत्ताधाऱ्यांच्या आवश्यक त्याच कार्यक्रमाला जातील'


'यापुढे आमचे नेते सत्ताधाऱ्यांच्या आवश्यक त्याच कार्यक्रमाला जातील'
SHARES

'आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते हे भाजपा आणि सरकारमधील मंत्री यांच्यासोबत आवश्यक असेल तिथल्याच कार्यक्रमात जातील, पण आम्ही विरोधकांची भूमिका चोख बजावू, जिथे वाभाडे काढायचे तिथे नक्की काढू', असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.


'सत्कार कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना बोलवणार नाही'

यापुढे 2019 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या सत्कार कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना बोलवणार नाही, असे देखील अजित पवार यांनी जाहीर केले. यापूर्वी पक्षाच्या काही नेत्यांच्या सत्कार कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना बोलावले होते. त्याबाबत विचारणा व्हायची, म्हणून आम्ही हा निर्णय घेतल्याचे अजित दादा म्हणाले. आमचे मुख्यमंत्र्यांसोबत भांडण नाही. कार्यक्रमात एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी जाणे ही आपली संस्कृती आहे, मात्र, त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये संभ्रम निर्माण होतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना बोलावणार नसल्याचे अजित पवार म्हणाले.


मंत्रिमंडळ विस्ताराला का घाबरता?

गेले काही महिने राज्यात मंत्रिमंडळ विस्तार आज होणार, उद्या होणार अशी चर्चा सुरू असताना अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्ताराची नुसती चर्चाच होते, प्रत्यक्षात काहीच केले जात नाही, असे सांगत विस्ताराला का घाबरता? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच 'होय हे माझे सरकार' या जाहिरातीची देखील अजित पवार यांनी खिल्ली उडवत 'हे माझे सरकार अजिबात नाही' असे म्हटले आहे.



हेही वाचा

मंत्रिपदासाठी राणेंना अजून करावी लागणार प्रतीक्षा


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा