Advertisement

मंत्र्यांच्या बंगल्यावर विरोधकांनी लावले काळे कंदील


मंत्र्यांच्या बंगल्यावर विरोधकांनी लावले काळे कंदील
SHARES

विविध मुद्द्यावर सरकारला विरोधक धारेवर धरत असतात. मात्र बुधवारी विरोधकांनी थेट मंत्र्यांच्या बंगल्यासमोर निषेधाचे काळे कंदील लावल्याचे पहायला मिळाले.



का लावला काळा कंदील?

शेतकऱ्यांची फसवी कर्जमाफी, राज्यातील लोडशेडिंग, रेशनिंग दुकानांवरील साखर गायब, महिलांची असुरक्षितता, वाढती महागाई यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहे. सरकारने राज्यातील जनतेवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आणली आहे, असा आरोप करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली भाजपा आणि शिवसेना मंत्र्यांच्या बंगल्याबाहेर काळे कंदील लावत सरकारचा निषेध केला.

सरकारची दिवाळी तर सामान्यांचे दिवाळे या सरकारने काढले आहेत, याची जाणीव सरकारला व्हावी यासाठी काळे कंदील लावल्याची प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली.



हेही वाचा -

कर्जमाफी झालेले मुंबईतले 813 शेतकरी कोण?


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा